जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सव आजपासून
*🛑जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सव आजपासून*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-२१*:-वाढत्या उन्हाळ्याचे कारण देत रद्द करण्यात आलेला सिंधुदुर्ग जि. प. शिक्षण विभागाचा जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सव २१ ते २३ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, ज्ञानी मी होणार, समुहगान, समुहनृत्य हे इनडोअर क्रीडा प्रकारच घेतले जाणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन २१ मार्च रोजी सकाळी ९ वाजता जि. प. शाळा ओरोस मुख्यालय येथे होणार आहे. शालेय बाल कला-क्रीडा व ज्ञानी मी होणार हा यावर्षीचा जिल्हास्तरीय महोत्सव घेण्यास मार्च उजाडल्याने वाढत्या उन्हाळ्याचे कारण देत तो रद्द करण्यात आला होता. जि. प. च्या या निर्णयाबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर किमान इनडोअर क्रीडा प्रकार आयोजित करण्याची मागणीही विविध शिक्षक संघटनांनी केली होती. विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय खेळासाठी मिळणारी शिष्यवृत्तीचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. त्यामुळे जि. प. ने अखेर इनडोअर क्रीडा प्रकार घेण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले आहे.यामध्ये २१ मार्च रोजी ज्ञानी मी होणार ही स्पर्धा बॅ. नाथ पै समिती सभागृह येथे होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत लहानगट तर दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत मोठा गट तर जि. प. शाळा. ओरोस मुख्यालय येथे समूह गायन स्पर्धा होणार आहे. सकाळी नऊ ते दुपारी एक मोठा गट व दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत लहान गट. २२ मार्च रोजी जि. प. शाळा ओरोस मुख्यालय येथे सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मोठ्या गटासाठी समूह नृत्य स्पर्धा होणार आहे. २३ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी एक या वेळेत लहान गटासाठीची समूह नृत्यस्पर्धा होणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

