पैसे नसल्याने सावंतवाडीत अडकलेल्या गृहस्थाला भरपेट खायला घालून पंढरपूला पाठवले
हाॅटेल सन्मान चे मालक प्रकाश पाटील यांच्या माणूसकीचे दर्शन
प्रतिनिधी – प्रशांत मोरजकर
सावंतवाडी – पंढरपूर येथील बाळू काळे हा इसम पैसे नसल्याने सावंतवाडीत अडकला होता व भूकेनेही व्याकूळ झाला होता.त्याला हाॅटेल सन्मान चे मालक प्रकाश पाटील यांनी पोटभर खायला घालून त्याची पंढरपूरला रवानगी केली त्यांनी दाखविलेल्या माणुसकी बद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की पंढरपूर येथील बाळू दादासाहेब काळे वय ५० हे सेंट्रींग कामासाठी गोवा येथे गेले होते, तीथेच त्यांना दुचाकीने धडक दिल्याने त्यांचा एक पाय फॅक्चर झाला होता, ते दोन महिने गोवा येथेच होते, पैशाची चणचण भासू लागल्याने ते मालकाकडे गेले मालकाने अवघे दोनशे रूपये देऊन त्यांची बोळवण केली.
ते कसेबसे काल संध्याकाळी सावंतवाडीत पोहचले तळ्याच्या काठावर आसरा घेत कालची रात्र तीथेच घालवली.आज सकाळी भूकेने पोटात कावळे ओराडायला लागल्याने पाॅम्पस समोरील सुमंत धुरी यांच्या टपरीवर येऊन भूक लागली मला वडा पाव द्या अशी मागणी केली, धुरी यांनी ही काहीह न विचारता त्यांना वडा पाव दिला मात्र त्याठीकाणी चहा पीत बसलेले हाॅटेल सन्मान चे मालक प्रकाश पाटील यांनी त्यांची चौकशी करून त्यांना सांगलीला पाठवण्याची व्यवस्था करुन बाळू काळे याला खर्चासाठी दोनशे रुपये वाहकाकडे देऊन तो सांगलीला उतरताना पैसे देण्यास सांगितले.
प्रकाश पाटील यांनी यापूर्वी ही अशा अडलेल्या लोकांना मदतीचा हात दिला आहे.त्या़नी दाखविलेल्या माणूसकी बद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतूक केले.

