कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कोलगांव माजी सरपंच प्रभाकर उर्फ भाई राऊळ यांचे निधन

कोलगांव माजी सरपंच प्रभाकर उर्फ भाई राऊळ यांचे निधन

सावंतवाडी, दि.०३:- कोलगांव माजी सरपंच तथा विविध कार्यकारी सोसायटी कोलगांव संचालक,सावंतवाडी खरेदी विक्री संघ संचालक प्रभाकर उर्फ भाई राऊळ यांचे आज सकाळी निधन झाले.सकाळी ६.३० च्या दरम्यान कोलगाव चाफेआळी येथे सुरुंगीच्या झाडावर सुरुंगीचे कळे काढण्यासाठी ते चढले होते. अचानक त्यांचा तोल गेल्याने ते खाली कोसळले,त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांच्या डोक्याला तसेच नाकाला जबर मार बसल्याने रक्तस्त्राव झाला. त्वरित त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालावली.
प्रभाकर उर्फ भाई राऊळ ह्यांनी कोलगाव सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष अशा अनेक पदावर काम केले होते सध्या ते कोलगांव विविध कार्यकारी सोसायटी चे संचालक तसेच सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणून कार्यरत होते. सामाजिक कार्यात ते कायम अग्रेसर होते त्याच्या जाण्याने कोलगाव गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात मुलगे,विवाहित मुलगी, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!