कुत्र्यांच्या हल्ल्यात बकऱ्यांचा मृत्यू
*🛑कुत्र्यांच्या हल्ल्यात बकऱ्यांचा मृत्यू*
*🛑सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-२९*:-मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढल्याच्या तक्रारी असतानाच आडारी भागात चरण्यासाठी आणलेल्या बकऱ्यांच्या कळपावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला – केला. यात कुत्र्यांनी तीन बकऱ्यांचा फडशा पाडल्याने खळबळ उडाली आहे. कुत्र्यांच्या या हल्ल्यात दोन बकऱ्या गायब झाल्या असून अद्याप – त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेने मेंढपाळ लक्ष्मण बाबूराव डोईफोडे यांचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव ही समस्या जैसे थे असून सध्या शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. रस्त्यावर तसेच प्रत्येक वाडीतील गल्लीबोळात कुत्र्यांचा संचार वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे. कुत्र्यांनी काहीजणांवर हल्ला चढवीत चावा घेतल्याच्या घटनाही वाढत आहेत. मालवण आडारी येथील कचरा डम्पिंग ग्राउंड परिसरात कुत्र्यांची संख्या वाढली आहे. याठिकाणी पूर्वीपासूनच कुत्र्यांची संख्या जास्त असून कुत्र्यांची पिल्ले आणून सोडण्यात येत असल्याने ती संख्या वाढली आहे. सोमवारी सायंकाळी कुंभारमाठ येथील लक्ष्मण बाबूराव डोईफोडे यांनी आपल्या बकऱ्या आडारी भागात चरण्यासाठी आणल्या असता, भटक्या कुत्र्यांनी या बकऱ्यांवर हल्ला चढविला. यात कुत्र्यांनी काही बकऱ्यांचा चावा घेत त्यांना जखमी केले. यात एक बकरी जागीच मृत झाली. तर अन्य दोन जखमी झालेल्या बकऱ्यांपैकी एका छोट्या बकरीचा आज मृत्यू झाला. कुत्र्यांच्या या हल्ल्यादरम्यान बकऱ्या सैरावैरा पळाल्याने अन्य दोन बकऱ्या गायब झाल्या आहेत. या घटनेमुळे लक्ष्मण डोईफोडे यांचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वस्ती भागातही कुत्र्यांची दहशत वाढली असून कुत्र्यांची भांडणे, भुंकणे यामुळे नागरिकांची रात्रीची झोपही उडाली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

