अन्नसुरक्षा लाभासाठी उत्पन्न मर्यादा नियम शिथील
*🛑अन्नसुरक्षा लाभासाठी उत्पन्न मर्यादा नियम शिथील*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि-२९*:-अन्न आणि पुरवठा विभाच्यावतीने धान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले जाते. त्याच अनुषंगाने शासनाने अन्नसुरक्षा योजना सुरू केली आहे. याचा फायदा लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. काही लोक उत्पन्न मर्यादा यामुळे वंचित राहत आहे. यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी नियम शिथील केले आहे. जेणेकरून अजूनही गरजवंत लोक याचा लाभ घेऊ शकतील. ज्या लोकांचे उत्पन्न ४५ हजारच्या आत आहे, त्यांना ही अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी गरजवंत पात्र नागरिकांनी उत्पन्न दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड झेरॉक्स प्रत घेऊन तहसील कार्यालयात पुरवठा विभाग यांच्याशी संपर्क साधावा. यावेळी काही समस्या किंवा अडचणी आल्यास आपल्याशी नागरिकांनी संपर्क साधावा. आवश्यक ती मदत भाजपच्यावतीने आपण करणार, असे माजी सभापती तथा भाजप जिल्हा पदाधिकारी प्रमोद कामत यांनी केले आहे. कामत हे नेहमीच समाजासाठी आधारवड ठरले आहे. शिक्षण, आरोग्य, किंवा अन्य क्षेत्रात नेहमीच त्यांनी लोकांना मदत केली आहे. लोकांचा अन्नसुरक्षा या सारखा ज्वलंत विषय हातात घेऊन तहसील कार्यालयात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण बांधील आहोत, असे स्पष्ट केले. समाजात आजही गरिबी आहे. त्यांना शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेचा मोठा लाभ होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात ही योजना राबविताना येणाऱ्या अडचणी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे – यांनी वेळोवेळी केंद्र सरकार, राज्य – सरकार यांच्या निदर्शनास आणून – दिल्या. त्यामुळे काही नियम शिथील – करण्यात आले आहे. योजनेचा लाभ घेताना कागदपत्र पूर्तता करणे आवश्यक आहे. काही अडचणी आल्यास संपर्क साधावा, असे आवाहन माजी सभापती तथा भाजप पदाधिकारी कामत यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

