३८ स्काऊट, गाईडस्ना राज्य पुरस्कार
*🛑३८ स्काऊट, गाईडस्ना राज्य पुरस्कार*
*🛑राज्य पुरस्कार चाचणी शिबीर : कोल्हापूर सोनतळी येथे आयोजन*
*🛑राष्ट्रीय टीमकडून परीक्षण*
*राज्यातील विविध स्काऊट, गाईड्सचा सहभाग*
*राज्य आणि राष्ट्रीय टीमकडून परीक्षण*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-२३*:-सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिरामध्ये जिल्हयातून १७ स्काऊट आणि २१ गाईडस्नी सहभाग घेतला होता. या शिबिरामध्ये सर्वजन यशस्वी झाले असल्याची माहिती स्काऊट गाईड जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड यांनी दिली.महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड, मुंबई यांच्या विद्यमाने डिसेंबर २०२३ व जानेवारी २०२४ या कालावधीत तीन दिवशीय निवासी चाचणी शिबीर, राज्य प्रशिक्षण केंद्र सोनतळी जिल्हा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले होते. या चाचणी शिबिरात लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक अशा चाचण्या घेण्यात आल्या. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील टीमने परिक्षणाचे कार्य केले. या शिबिराकरीता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील स्काऊटस आणि गाईडस यांनी सहभाग नोंदविला होता.या राज्यस्तरीय चाचणी परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्हयातील स्काऊट गाईडनी यशस्वी व्हावे म्हणून जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्य/योजना) प्रदीपकुमार कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चाचणी पूर्व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पाच लेखी सराव परीक्षा व एक दिवस प्रात्याक्षिक परीक्षेचे आयोजन डिसेंबर २०२३ मध्ये स्काऊट गाईड कार्यालय येथे करण्यात आले होते. यशस्वी स्काऊट आणि गाईडचे अभिनंदन जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट गाईड प्रकाश कदम, जिल्हा चिटणीस क्लारा डिसोजा, सह. चिटणीस अ. अ. अवटी, कोषाध्यक्ष स्नेहलता राणे, मुकुंद जाधव, रामचंद्र आंगणे, शोभराज शेर्लेकर,श्रद्धा कदम, श्रद्धा कुलकर्णी, विठोबा लब्दे, जे. जे. शेळके, अरविंद मेस्त्री, सुरेखा कदम, विनयश्री पेडणेकर, धोंडू रेडकर, नितिन सावंत, सर्व कार्यकारिणी मंडळ यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

