🟥 डेगवे येथे 108 सूर्यनमस्कार शिबीर संपन्न..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-१८:- पतंजली योग समिती सिंधुदुर्ग मार्फत श्री देव महालक्ष्मी स्थापेश्वर मंदिर डेगवे येथे शुक्रवारी रथसप्तमीला 108 सूर्यनमस्कार शिबिर चे आयोजन करण्यात आले होते.आंतरराष्ट्रीय सुर्यनमस्कार दिनाचे अर्थात रथसप्तमी चे औचित्य साधून सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला अध्यक्ष म्हणून भारत स्वाभिमान सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी डॉ. तुळशीराम रावराणे आणि उद्घाटक म्हणून पतंजली योगसमिती सिंधुदुर्ग जिल्हाप्रभारी शेखर बांदेकर लाभले.
यावेळी डेगवे ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश देसाई,भारत स्वाभिमान कणकवली तहसिल प्रभारी प्रकाश कोचरेकर,पतंजली योगसमिती सहतहसील प्रभारी मधुकर देसाई, सोशल मीडिया तहसील प्रभारी लक्ष्मण पावसकर, सोशल मीडिया सह तहसिल प्रभारी लाडोबा देसाई,युवा भारत तहसिल प्रभारी मयुरेश गवंडळकर,युवा भारत सहतहसील प्रभारी तेजस परब, किसान सेवा समिती सावंतवाडी तहसिल प्रभारी संतोष मोरे, विकास केरकर, आपा चिंदरकर, उत्तम देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
दिप प्रज्वलनाने उदघाटन झाल्यानंतर 108 सूर्यनमस्कार चे शिबीर जिल्हाप्रभारी शेखरजी बांदेकर यांनी घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा नाईक आणि दिपाली गवस यांनी केले,तर आभार प्रदर्शन ऋग्वेदीता देसाई यांनी केले. सदर शिबिरास पतंजली योगसमिती बांदा,पतंजली योगसमिती डेगवे, पतंजली योगसमिती पडवेमाजगाव आणि पतंजली योगसमिती पत्रादेवी चे सर्व योगसाधक उपस्थित होते, तसेच डेगवे गावातील नागरिकांनी देखील सहभाग घेतला.श्री देव स्थापेश्वर मंदिर च्या व्यवस्थापकांनी सदर शिबिरासाठी लागणारे स्टेज, साउंड सिस्टीम आणि जागा मोफत उपलब्ध करून दिली.सूर्यनमस्कार म्हणजे योगाभ्यासातील सर्वांग सुंदर असा अभ्यास आहे आणि ही काळाची गरज देखील आहे असे उदघाटक बांदेकर यांनी सांगितले.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

