कुडाळ येथून उद्या ‘शिव’ पदमोहीम
*🟥कुडाळ येथून उद्या ‘शिव’ पदमोहीम*
*🟥सिंधुदुर्गातील दोनशे डॉक्टर होणार सहभागी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कुडाळ, दि.१७*:-शिवजयंतीचे औचित्य साधत रांगणा रनर्स-रागिणी या डॉक्टरांच्या फिटनेस ग्रुपच्यावतीने १८ फेब्रुवारी रोजी ‘शिवमोहिम’ या पदमोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील डॉक्टरांसाठी असलेल्या या मोहिमेत जवळपास दोनशे डॉक्टर सहभागी होणार आहेत. ही पदमोहीम १८ रोजी रात्री ९ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृह येथून रवाना होणार आहे.. १९ रोजी पहाटे ६ वाजता किल्ले राजकोट (मालवण) येथे रात्रभर चालत मोहिमेची सांगता होईल. तिथे शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. डॉ. रमेश परब, डॉ. संजीव आकेरकर, डॉ. राजेंद्र पाताडे, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. गिरीश राणे, डॉ. प्रशांत कोलते यांच्या हस्ते झेंडा दाखवून या पदमोहिमेला सुरूवात होईल. शिवघोष करीत कुडाळ बाजारपेठेतून ही मोहीम राजकोट येथे कूच करेल. काळसे-डॉ. सोमनाथ परब, चौके-डॉ. काळसेकर यांच्या निवासस्थानी, डॉ. सोमवंशी हॉस्पिटल येथे थोडी विश्रांती घेत मालवण बाजारपेठ येथून शिवघोष करीत पहाटे राजकोट येथे जाईल. डॉ. विवेक रेडकर, डॉ. अजित लिमये, डॉ. राहुल पंतवालावलकर, डॉ. अविनाश झांट्ये, डॉ. शुभांगी जोशी, डॉ. सिद्धेश सकपाळ आणि मालवण डॉक्टरांच्यावतीने सर्वांचे स्वागत करण्यात येणार आहे. तेथे विविध कार्यक्रमांसह शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. प्रकाश नारकर यांच्या स्मरणार्थ ‘हिरकणी’ पुरस्कार देण्यात येणार आहे.जिल्ह्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा महान इतिहास लाभला आहे. तो नवीन पिढीपर्यंत पोहोचावा, आपले गड-किल्ले लोकांपर्यंत पोहोचावे, छत्रपतींचे गुण अंगिकारण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा व व्यस्त दिवसातून शारीरिक फिटनेससाठी वेळ काढावा, या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, असे रांगणा रनर्स-रागिणीच्यावतीने सांगण्यात आले. जास्तीत-जास्त डॉक्टर्सनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन रांगणा रनर्स-रागिणी आणि सिंधुप्रेमी डॉक्टर्स, डॉक्टर्स फॅटर्निटी क्लबच्यावतीने करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

