कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 “समकालीन साहित्य आणि समाज” या विषयावर गोगटे वाळके कॉलेजमध्ये राष्ट्रीय चर्चासत्र

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-१५:- बांदा येथील गोगटे वाळके कॉलेज बांदा येथे येत्या शनिवारी ‘ समकालीन साहित्य आणि समाज ‘या विषयावर भाषा विभागाच्यावतीने एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोविंद काजरेकर यांनी दिली.

भाषा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या चर्चासत्राचे उदघाटक म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे चेअरमन श्री डी.बी. वारंग हे उपस्थित राहणार आहेत तर या चर्चेसत्राचे बीजभाषक म्हणून मराठीतील ख्यातनाम साहित्यिक व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक प्रवीण बांदेकर हे लाभणार आहेत.या राष्ट्रीय चर्चासत्रात मराठी, हिंदी,इंग्रजी व कोकणी भाषेतील विषयतज्ञ,संशोधक प्राध्यापक,विद्यार्थी संशोधक,प्रतिनिधी आदिजण उपस्थित राहणार आहेत.या राष्ट्रीय चर्चासत्रात महाराष्ट्र,गोवा, कर्नाटक,केरळ, आदी विविध राज्यातील तज्ञ अभ्यासक आपले शोधनिबंध सादर करणार आहेत.हे चर्चासत्र एक दिवसीय असून दिवसभर विविध सत्रात विषयतज्ज्ञ व अभ्यासकांमध्ये सुसंवाद स्वरूपात चालणार आहे तसेच हे चर्चासत्र ऑनलाईन(आभासी पध्दतीने)व ऑफलाईन पद्धतीने चालणार आहे. समकालीन साहित्यातून प्रतिबिंबित होणारे साहित्य समाजाला कसे दिशादर्शक ठरते,समकालीन साहित्याच्या जाणीवा आणि सामाजिकता, समकालीन प्रयोगशील साहित्य समाजाच्या जडणघडणीत कोणते योगदान देते, साहित्य आणि समाज यांचा सहसंबंध कसा प्रस्थापित होतो. यावर या चर्चासत्रात विचारमंथन अपेक्षित आहे.यावेळी साहित्य,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यंवर या चर्चासत्राला भेट देऊन सुसंवादात सहभागी होणार आहेत.तरी अभ्यास,संशोधक, वाचक यांनी या चर्चासत्राला उपस्थित राहावे,असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोविंद काजरेकर व राष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक प्रा.डॉ. दत्तगुरु जोशी यांनी केले आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!