कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

गौणखनिज उत्खननाविरोधात आत्मदहनाचा इशारा

*🟥गौणखनिज उत्खननाविरोधात आत्मदहनाचा इशारा*

*🟥इन्सुली, वेत्ये, निगुडे, सोनुर्ली येथील ग्रामस्थांचे निवेदन : ब्लास्टिंग कायमस्वरुपी बंद करा!*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओरोस, दि.१४*:-इन्सुली, वेत्ये, निगुडे, सोनुर्ली येथील सुरू असलेले गौणखनिज उत्खनन बंद करण्याचे आश्वासन देऊनही अद्याप त्यावर योग्य ती कार्यवाही न झाल्याचा आरोप करीत तेथील ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. इन्सुली-वेत्ये-निगुडे-सोनुर्ली येथील सुरू असलेले गौण खनिज उत्खनन, क्रशर व ड्रिलिंग त्वरित बंद करावे, या मागणीसाठी २६ जानेवारी रोजी सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्या कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात आले होते. यावेळी एका पत्राने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन देऊन आम्हाला उपोषणापासून परावृत्त करण्यात आले. मात्र दिलेल्या पत्राप्रमाणे अद्यापही ठोस कार्यवाही झाली नसल्याकडे इन्सुली,कोठावळेवांध येथील अजय श्रीधर कोठावळे, सुबोध महादेव परब, शरद गंगाराम कोठावळे, नंदकिशोर वासुदेव कोठावळे यांनी खनिकर्म विभागाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.२ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी कार्यालयात केलेल्या पडताळणीवेळी एका कंपनीच्या नावे २९ मे २००९ साली दिलेला बोअर ब्लास्टिंगचा परवाना दिसून आला असून त्याचे पुन्हा नूतनीकरण करण्यात आलेले नाही. सदरची कंपनी पूर्वीच बंद झाली आहे. सदर जागेवर दुसऱ्याच कंपनीचे उत्खनन व क्रशर सुरू असून त्यांच्याकडे तसेच अन्य भागीदार यांच्याकडे बोअर ब्लास्टिंगचा परवाना नसल्याचे पडताळणीवेळी दिसून आले आहे. आपल्या समक्ष ही पडताळणी झाली असून संबंधितांकडे ब्लास्टिंगचा परवाना नसतानाही सर्व नियम व कायदेशीर तरतुदी धाब्यावर बसवून बोअर ब्लास्टिंग सुरू आहे, असा आरोप या नागरिकांनी केला आहे. याबाबत पुढील पंधरा दिवसांत इन्सुली-वेत्ये- निगुडे-सोनुर्ली येथील ब्लास्टिंग कायमस्वरुपी बंद करण्यात यावे. तसेच यापुढे या गावात नव्याने क्रशर, उत्खनन परवानगी देण्यात येऊ नये. तसेच ज्यांचे परवाने संपले आहेत, त्यांना नूतनीकरण करून देऊ नये. त्याला आमची कायदेशीर हरकत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, पंधरा दिवसांत कार्यवाही न झाल्यास आम्हास नाईलाजास्तव आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करावे लागेल. त्यामुळे होणाऱ्या सर्व कायदेशीर परिणामांची व आमच्या पश्चात आमच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!