कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

वेंगुर्ल्यात १६ पासून मोबाईल व्हॅन कायदेविषयक शिबीर, लोकअदालत

*🟥 वेंगुर्ल्यात १६ पासून मोबाईल व्हॅन कायदेविषयक शिबीर, लोकअदालत*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले,दि.१४*:-तालुका विधी सेवा समिती वेंगुर्लामार्फत १६ ते २० फेब्रुवारीपर्यंत मोबाईल व्हॅन लोकअदालत व कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उच्च न्यायालय, विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.सदर मोबाईल व्हॅन १६ रोजी वजराट गावात जाणार असून ग्रामपंचायत कार्यालय वजराट येथे दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत कायदेविषयक जनजागृतीपर शिबिराचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात अॅड. शिवानी प्रभुखानोलकर, अॅड. पुनम नाईक, अॅड. सागर ठाकुर, आरती गावडे मार्गदर्शन करणार आहेत. १७ रोजी पालकरवाडी ग्रामपंचायत येथे सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत जनजागृतीपर शिबिराचे आयोजन केलेले आहे. अॅड. श्रीकृष्ण ओगले, अॅड. पुनम नाईक, अॅड. सागर ठाकुर यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. २० रोजी होडावडे ग्रामपंचायत येथे सकाळी १०.३० वाजता मोबाईल लोकअदालतीचे आयोजन केले असून त्यामध्ये होडावडा गावातील दिवाणी व फौजदारी स्वरुपाची प्रलंबित प्रकरणे व वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. या मोबाईल लोकअदालतीमध्ये होडावडा गावातील ग्रामस्थांनी जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून तडजोडीने मिटवावित. तसेच वजराट व पालकरवाडी येथील ग्रामस्थांनी जनजागृतीपर शिबिराला उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ला तालुका विधी सेवा समिताच्या अध्यक्षा तथा वेंगुर्लेच्या दिवाणी न्यायाधीश श्रीमती के. के. पाटील, सहदिवाणी न्यायाधीश डी. वाय. रायरीकर यांनी केले आहे.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!