पोर्टलच्या नावाखाली आरक्षण संपविण्याचा डाव – अंकुश जाधव
*🟥पोर्टलच्या नावाखाली आरक्षण संपविण्याचा डाव – अंकुश जाधव*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.१३*:-पवित्र पोर्टलचे स्वागतच, पण संस्थांनी भरलेल्या शिक्षकांचे भवितव्य काय? पवित्र पोर्टलच्या गोंडस नावाखाली आरक्षण तर संपवायचे नाही ना? ५० टक्के पदवीच्या सरसकट गुणांमुळे अनेक उमेदवारांना फटका बसणार आहे. आरक्षित प्रवर्गाला सुट का नाही? असे अनेक सवाल जि. प. चे माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी उपस्थित केले आहेत. स्थानिक उमेदवारांना न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शिक्षक भरती बंद असताना विद्याथ्यचि शैक्षणिक नुकसान नको. तसेच वारंवार शिक्षण विभागाला पाठपुरावा करून शिक्षक मिळत नसल्याने काही संस्थांनी आपल्या स्तरावर शिक्षक भरती केली. २०१७ पर्यंतच्या भरतीला शासनाने परवानगी देत त्या सर्व शिक्षकांना सेवेत सामावून घेतले. मात्र या नंतरही सिंधुदुर्गातील अनेक शिक्षकांची पदे रिक्त झाली. मात्र त्यानंतरही शिक्षण विभागाला जाग आली नाही. त्यामुळे भरती प्रक्रिया केवळ दिखावा करण्यासाठी पवित्र पोर्टलवर खेळ सुरू झाले. मात्र काही केल्या शिक्षक भरती होईना आणि शिक्षण विभागाला जाग येईना. अखेर विद्याथ्यचि शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून काही संस्थांनी आपल्या अधिकारात शिक्षक नियुक्त केले. मात्र पवित्र पोर्टल कारण देत शिक्षण विभागाने या शिक्षकांचे सर्व प्रस्ताव नाकारले. आज शिक्षण संस्थेने जे शिक्षक भरले आहेत, त्याबाबत शिक्षण मंत्र्यांची भूमिका खूप महत्वाची असून जे शिक्षक सध्या संस्थांनी घेतले आहेत, ते विद्याथ्यचि नुकसान होऊ नये म्हणून घेतले आहेत. त्यांच्या सेवेचा सहानुभूतीपूर्वक विचार होणे गरजेचे आहे. आज अनेक शाळांमध्ये २०१७ नंतर ही सेवा करणारे शिक्षक संस्थांनी आपल्या स्तरावर नेमलेले आहेत. मात्र ते शासनस्तरावर शिक्षक म्हणून दिसत नाही. शिक्षण मंत्र्यांनी या विषयावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे जाधव म्हणाले.२०२४ नंतर जी पदे शिक्षकांची पदे होतील, ती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरावी. मात्र सध्या संस्थांनी जे शिक्षक आपल्या स्तरावर घेतले आहेत, अशा शिक्षकांना शिक्षणमंत्र्यांनी त्यांच्या सेवेचा विचार करून जे शिक्षक संबंधित जागेवर काम करतात, त्यांच्या भवितव्याचा विचार करणे गरजेचे आहे, असे जाधव म्हणाले. विना वेतन काम करणाऱ्या शिक्षकांवर जर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अन्याय होत असेल, तर त्या विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा जाधव यांनी दिला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

