रोटरी क्लब सावंतवाडी च्या वतीने घेण्यात आलेल्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये 27 जणांनी केली मोफत तपासणी
*🟥 रोटरी क्लब सावंतवाडी च्या वतीने घेण्यात आलेल्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये 27 जणांनी केली मोफत तपासणी*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि.१२*:-सावंतवाडी येथे रोटरी क्लबच्या फिजिओथेरपी सेंटरच्या मोफत तपासणी शिबिरात मार्गदर्शन करताना अध्यक्ष सुहास सातोसकर सोबत प्रवीण परब हरिश्चंद्र पवार, अमोल टेंबकर अभिमन्यू लोंढे अण्णा देसाई डॉ. रेवण खटावकर डॉ.ऐन्जेलो आदी सावंतवाडी प्रतिनिधी रोटरी इंटरनॅशनल क्लबच्या वतीने सावंतवाडी येथे फिजिओथेरपी सेंटर साठी अडीच लाख रुपयांचे अत्याधुनिक मशीन बसवण्यात आले असून याचा लाभ सर्वसामान्यांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी चे अध्यक्ष सुहास सातोसकर यांनी केले. अल्प दरात सर्वांसाठी ही सुविधा उपलब्ध असल्याचे ते म्हणाले ते फिजिओथेरपी मोफत तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.या फिजिओथेरपी सेंटरमध्ये शिबिरास 27 जणांनी तपासणी करून घेतली यावेळी सचिव प्रवीण परब सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णा देसाई अस्थिरोग तज्ञ डॉ. रेवण खटावकर B.P.T. बॅचलर ऑफ फिजीओथेरपी डॉ. एंजेला रॉड्रीक्स, ट्रस्ट सचिव सीए सुधीर नाईक, भालचंद्र कशाळीकर,दिव्यांग विकास केंद्र – संस्थापक अध्यक्ष – रुपाली पाटील,साईप्रसाद हवालदार, विजय कामत, अॕड. प्रकाश परब, प्रमोद भागवत,दिलीप म्हापसेकर,राजेश पनवेलकर, रोटरीच्या माजी अध्यक्ष डॉ विनया बाड आनंद रासम आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे म्हणाले रोटर क्लबच्या वतीने विविध उपक्रम साजरे होत असतात फिजिओथेरपी सेंटर गरजेचे होते आणि ते सुरू करण्यास रोटरीने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे तर यावेळी सावंतवाडी पत्रकार संघाचे तालुकाप्रमुख हरिश्चंद्र पवार यांनी रोटरी या सेवाभावी संस्थेकडून विविध उपक्रम होत असतात या उपक्रमात सावंतवाडी तालुका पत्रकार संघाला सहभागी करून घेतल्याने त्याचा लाभ सर्वसामान्य पर्यंत मिळेल ज्याप्रमाणे नेत्र तपासणी आणि चष्मे वाटपाच्या कार्यक्रमात 65हून अधिक जणांना मोफत तपासणी सुविधा उपलब्ध करून दिली अशा उपक्रमाना तालुका पत्रकार संघ नेहमीच सोबत राहून व सहकार्य करेल असा शब्द त्यांनी दिला रोटरी क्लबच्या वतीने फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्यात आले यासाठी उपयुक्त यंत्रसामग्री आणण्यात आली आहे याबाबतची माहिती रोटरीच्या वतीने सर्वसामान्यांना देण्याचे आवाहन सिंधुदुर्ग डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अमोल टेंबकर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव प्रवीण परब यांनी केले तर सूत्रसंचालन दिलीप म्हापसेकर यांनी केले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

