आणखीमहाराष्ट्र

🟥 नांदेडमध्ये महाप्रसादातून सहाशेपेक्षा अधिक जणांना विषबाधा; रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴नांदेड, दि-०७:- भगर आमटीच्या भंडारा प्रसादातून सहाशेहुन अधिक जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना नांदेडच्या लोहा तालुक्यातील सावरगाव कोस्टवाडीत समोर आली आहे. यावेळी अख्ख्या गावाला विषबाधा झाली असल्याची परिस्थिती पाहायला मिळत असून, विषबाधेनंतर गावकऱ्यांना लोहा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

मात्र, रुग्णांची संख्या मोठी असल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, रुग्णांना नांदेडच्या खाजगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. रात्री उशिरा झालेल्या विषबाधेच्या घटनेनंतर सर्वच रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नांदेडच्या लोहा तालुक्यातील सावरगाव कोस्टवाडी इथे भंडारा जेवणातून शेकडो जणांना विषबाधा झाली. त्यापैकी सहाशे रुग्ण नांदेडच्या सरकारी रुग्णालयात पहाटे दाखल झाले आहेत. रुग्णालय प्रशासनाने तातडीने या रुग्णावर उपचार सुरू केले असून, विषबाधा ग्रस्त नागरिकांचा आकडा आणखीन वाढत चाललाय. त्यामुळे इतर रुग्णालयात रुग्णांना हलवण्यात आल्याचे अधिष्ठाता यांनी ‘एबीपी माझा’ला सांगितले. सावरगाव इथे बाळू मामाची मेंढर आली होती. त्यासाठी रात्री भगर आमटीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसादाच्या सेवणासाठी तब्बल तीन ते चार हजार लोकांचा जमाव जमला होता. प्रसादाच्या सेवनानंतर रात्री उशिरा भाविकांना उलट्या मळमळीचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे या शेकडो विषबाधा ग्रस्त रुग्णांना नांदेडच्या सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान, विधबाधा ग्रस्त सर्व रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिल आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!