कसाल येथील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा
प्रतिनिधी – सुनील आचरेकर
कसाल:- मालवण तालुक्यातील पळसंब येथील रुपेश भूषण बेनकर हे कसाल येथून डिकवल येथे पाहुण्यांकडे जाण्यासाठी कसाल स्टॅन्ड वरील रिक्षाचालक किशोर सावळाराम कसालकर यांच्या रिक्षातून डिकवल येथे गेले दरम्यान बेनकर यांना आपला मोबाईल कुठेतरी पडल्याचे लक्षात आले कदाचित मोबाईल रिक्षात पडला असावा यासाठी ते याचा शोध घेण्यासाठी पुन्हा कसाल येथे गेले सुदैवाने रिक्षाचालक किशोर कसालकर यांना तो मोबाईल मिळाला होता यांनी रिक्षा स्टॅन्ड वरील सर्व रिक्षाचालकांना याबाबत माहिती देऊन ठेवली होती रुपेश बेनकर यांनी कसाल स्टँड वरील रिक्षाचालकांकडे चौकशी केली असता यांचा मोबाईल किशोर कसालकर यांच्याकडे असल्याचे समजल्यावर बेनकर यांना हायसे वाटले दरम्यान अन्यत्र भाडे सोडण्यासाठी गेलेले किशोर कसालकर कसाल स्टँडवर येथे आल्यावर यांनी बेनकर यांचा मोबाईल परत केला रिक्षाचालक किशोर कसालकर यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे