🟥 ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण ; मुख्यमंत्र्यांची घोषणा..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मुंबई, दि-३१:- ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले.
अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छूटांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.
गंभीर भूमिकांबरोबरच विनोदी चित्रपटात सहज अभिनय साकारणारा अभिनेता म्हणून अशोक सराफ यांची ख्याती. काही चित्रपटांतूनही ते खलनायकाच्या भूमिकेतही दिसले. परंतु, गंभीर आणि खलनायकांच्या भूमिकांपेक्षा त्यांच्या विनोदी भूमिका मात्र अधिक गाजल्या. बोलण्याची विशेष लकब आणि दमदार आवाजाने अशोक मामा यांची ओळख एक विनोदी कलाकार म्हणून कायमची छाप सिनेसृष्टीवर उमटली. छोट्या पडद्यावर येण्यापूर्वी रंगभूमीवरील त्यांचं सादरीकरण ‘अफलातून’च आहे. तर संगीत नाटकातीलही त्यांच्या भूमिकांचे कौतुक करावं लागेल. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांचे रंगभूमीवर सादरीकरण केले. वि. वा. शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी’ची कथेच्या सादराकरणात अशोक सराफ एक प्रतिभावंत कलावंत म्हणून उतरले. ययाती आणि देवयानी नाटकात त्यांनी विदूषकाची भूमिका साकारली होती.
अशोक सराफ यांनी अडीचशेहून अधिक चित्रपट गाजवले. ‘दोन्ही घरचा पाहुणा’, ‘जवळ ये लाजू नको,’ ‘तुमचं आमचं जमलं,’ ‘दिड शहाणे’, ‘हळदी कुंकू’, ‘दुनिया करी सलाम’, ‘पांडू हवालदार’, ‘कळत नकळत’, ‘भस्म’, ‘वजीर’, ‘चौकट राजा’, ‘अशी ही बनवा बनवी,’ ‘गोंधळात गोंधळ,’ ‘बिन कामाचा नवरा,’ ‘लपंडाव,’ ‘एक डाव भुताचा,’ ‘आम्ही सातपुते’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपली वेगळी ओळख बनवली. ‘नवरी मिळे नवऱ्याला’,’ आत्मविश्वास’, ‘गंमत जंमत’, ‘आयत्या घरात घरोबा’पासून, ‘शुभमंगल सावधान’, ‘आई नंबर वन’ व ‘एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर’ यांसारख्या चित्रपटांसून वेगळ्या भूमिका साकारून त्यांनी हम भी किसीसे कम नहीं हे दाखवून दिले.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

