🟥 नगर येथील आढाव वकील दाम्पत्याच्या निर्घृण हत्येचा जिल्हा बार असो. कडून निषेध..
🟥 आरोपींना तात्काळ अटक करण्याचे तहसीलदारांना निवेदन..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ, दि-३१:- राहुरी – अहमदनगर येथे वकिली व्यवसाय करणाऱ्या वकील दाम्पत्याच्या निर्घृण हत्येचा सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन व कुडाळ तालुका बार असोसिएशनच्यावतीने मंगळवारी तीव्र निषेध करण्यात आला. या हत्याकांडाचा सखोल तपास होऊन सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी. तसेच वकिलांच्या संरक्षणासाठी अॅड- व्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी शासनाला पाठविण्यासाठी मंगळवारी कुडाळ तहसीलदार यांना कुडाळ तालुका बार असोसिएशनच्या- वतीने दिलेल्या निवेदनात केली आहे.
राहुरी – अहमदनगर येथे वकील राजाराम आढाव व वकील मनीषा आढाव हे दाम्पत्य आपला वकिली व्य- वसाय करीत होते. त्यांची २५ जानेवारी रोजी निघृण हत्या करण्यात आली. याचे तीव्र पडसाद वकील संघटनांमध्ये उमटत आहेत. या अनुषंगाने कुडाळ तालुका बार असोसिएशनने मंगळवारी कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांना या हत्येच्या पाश्र्वभूमीवर निवेदन देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच या घटनेचा सिंधुदुर्ग जिल्हा व कुडाळ तालुका बार तालुका असोसिए- शनने निषेधही केला. कुडाळ तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. राजश्री नाईक, सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. विवेक मांडकुलकर, अॅड. राजीव बिले, अॅड. सुनील लोट, अॅड. गौरव पडते, अॅड. समीर कुलक- र्णी, अॅड. निकिता सामंत, अॅड. भाऊराव (चैतन्य) परब, अॅड. सिद्धेश कुबल यांनी वकील सदस्यांच्या सह्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर केले. निवासी नायब तहसीलदार संजय गवस यांनी ते स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे, अॅड. राजाराम आढाव व अॅड. मनीषा आढाव या दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या वकील दाम्पत्यां- च्या झालेल्या निघृण हत्येचा सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन व कुडाळ तालुका बार असोसिएशन तीव्र निषेध करीत आहे. सदर हत्याकांडाचा सखोल तपास होऊन सर्व आरोपींना तात्काळ अटक व्हावी व त्या आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी. अशी सर्व वकील सद- स्यांची आग्रही मागणी आहे.
प्रस्तुत वकील संरक्षण कायदा तात्काळ लागू करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यासाठी आपल्या मार्फत महाराष्ट्र शासनाल कळविण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

