🟥 भाजप सत्तेत असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही ; फडणवीस
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴नागपूर, दि-३० :- आमचं सरकार कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसींच्या हक्कांचं जतन करावं लागेल, हे स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील माहिती आहे. भाजप सत्तेत असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही. वेळ आली तर मी आमच्या पक्षश्रेष्ठींशी बोलीन, अशा शब्दात ओबीसी आरक्षणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक भूमिका स्पष्ट केली.
त्याचवेळी मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले दिले जाणार नाहीत, ज्यांच्या कुणबी नोंदी मिळतील, त्यांनाच दाखले दिले जातील, असंही फडणवीस यांनी निःक्षून सांगितलं.नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही माहित आहे की, आपल्याला ओबीसी समाजाचे संरक्षण करायचे आहे. त्यामुळे त्यांचीही भूमिका स्पष्ट आहे. मला स्पष्टपणे सांगायचे आहे,
जोपर्यंत भाजपचे सरकार आहे, तोपर्यंत काहीही झाले तरी आम्ही ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही. उद्या जर अशी वेळ आली की, ओबीसीला संरक्षण देता येत नाही, तर मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेन, पण काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही.
मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले दिले जाणार नाहीत, ज्यांच्या कुणबी नोंदी मिळतील, त्यांनाच दाखले दिले जातील. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची महायुती सरकारची भूमिका आहे, असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

