कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सिंधुदुर्गात सकल मराठा समाज कार्यरत राहणार -राज्य समन्वयकांच्या सूचना

*🟥सिंधुदुर्गात सकल मराठा समाज कार्यरत राहणार -राज्य समन्वयकांच्या सूचना*

*🟥 सावंतवाडी सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांची माहिती*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,दि-२२*:-मनोज जरांगे पाटील हे सकल मराठा समाज या झेंड्याखाली आपला लढा समाजासाठी लढत आहेत व सकल मराठा समाज व राज्य समन्वयक आजही राज्यात मराठा समाजाचे काम पाहत आहेत, कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली अथवा राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सकल मराठा समाज मध्ये पदावर घेण्यात आले नव्हते तोच अजेंडा कायम ठेवण्यासाठी राजकीय मराठा समाज बांधवांना सल्लागार म्हणून घेण्यात आले, म्हणून राज्य स्तरीय सकल मराठा समाजाचे समन्वयक रघुनाथ पाटील, तुषार काकडे व सिंधुदुर्गातील राजकीय सल्लागार नेते मंडळी यांच्या सूचनेनुसार सावंतवाडी सकल मराठा समाज म्हणून आमचे सुरु असलेले कार्य या पूढेही अविरतपणे सुरू ठेवणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.
सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष म्हणून सीताराम गावडे, उपाध्यक्ष लक्ष्मण नाईक,सचिव आकाश मिसाळ व त्यांची कार्यकारणीने यापूढेही आपले काम सूरु ठेवावे अशा सूचना सकल मराठा समाजाच्या राज्य समन्वयकांनी दिल्या आहेत, याबाबत जिल्ह्यातील मराठा राजकीय नेते मंडळींनी राज्य समन्वयकांशी बोलने करून दिल्यावर सकल मराठा समाजाचा तालुका अध्यक्ष म्हणून मी हा निर्णय घेतला आहे.
सकल मराठा समाज कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली,अथवा राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला संघटनेच्या पदावर स्थान देत नाही तर त्यांना सल्लागार म्हणून घेतले जाते, राज्यात मराठा समाजाच्या सुमारे दीडशे संघटना आहेत मात्र सर्व संघटनांचा उद्देश मराठा आरक्षण हाच आहे.
सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन लवकरच याबाबत विस्तृत माहिती देण्यात येणार आहे,मराठा समाज बांधवांमध्ये कोणताही स़भ्रम निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठांच्या सूचनेसार सदरचा खुलासा मी करीत आहे,असे सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी म्हटले आहे.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!