जिल्हयात शासकिय रुग्णालयात प्रथमच महिला लॅप्रोस्कोपिक सर्जन
*🟥जिल्हयात शासकिय रुग्णालयात प्रथमच महिला लॅप्रोस्कोपिक सर्जन*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 वेंगुर्ले, दि.१८*:-मेघालय राज्यातील मूळ रहिवासी, सध्या कुडाळस्थित आणि औरंगाबाद येथील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये मास्टर ऑफ सर्जनची पदवी संपादन केलेल्या डॉ. मोनालिसा वजराटकर यांची कुडाळ महिला रुग्णालयात जनरल सर्जन मोनालिसा बजराटकर (एम. एस.) म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला आहे. जिल्हयातील शासकिय रुग्णालयांतील त्या पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक जनरल सर्जन आहेत. डॉ. मोनालिसा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण “मेघालय राज्यात झाले असून एमबीबीएस शिक्षण त्रिपुरा राज्यामध्ये झाले आहे. एम. एस. जनरल सर्जन ही उच्च पदवी त्यांनी औरंगाबाद येथील शासकिय मेडिकल कॉलेजमध्ये पूर्ण करून तीन वर्षांची शासकिय नोकरी मुंबईतील शताब्दी हॉस्पीटलमध्ये पूर्ण केली → आहे. अलिकडेच नोव्हेंबर महिन्यात त्या कुडाळ येथील लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अनिकेत पांडुरंग वजराटकर त्यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आहेत. त्यांची शासनाने कुडाळ येथील महिला रुग्णालयात महिला जनरल सर्जन म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी तीन वर्षांच्या कालावधीत अपेंडिस, हर्निया, पित्ताशयाचे आजार, मुळव्याध तसेच महिलांच्या स्तनाचे आजार, डायबेटीस संदर्भातील शस्त्रक्रिया हाताळलेल्या असून त्याचा लाभ कुडाळ महिला रुग्णालयात दाखल रुग्णांना होणार आहे. तसेच त्या लॅप्रोस्कोपिक जनरल सर्जन असल्याने दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याच्या त्यांच्या अनुभवाचा फायदा महिलांना मिळणार आहे. डॉ. मोनालिसा या सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयातील सर्जन डॉ. पी. डी. वजराटकर यांच्या स्नुषा होय.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

