कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

स्वच्छ सर्वेक्षणात वेंगुर्ले नगर परिषद कोकणात प्रथम

*🟥स्वच्छ सर्वेक्षणात वेंगुर्ले नगर परिषद कोकणात प्रथम*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वेंगुर्ले, दि.१८*:-वेंगुर्ले नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये १५ हजारापेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरीनुसार कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. देशामध्ये एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरातून पश्चिम विभागात ३७ वा, महाराष्ट्रामध्ये ३९ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच वेंगुर्ले शहरास जीएफसी १ स्टार व ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे वेंगुर्ले नगर परिषदेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.वेंगुर्ले नगर परिषदेमार्फत घरोघरी १०० टक्के विलगीकृत कचऱ्याचे संकलन केले जाते. या विलगीकृत कचऱ्याचे नगर परिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ (कंपोस्ट डेपो) येथे विविध २७ प्रकारात वर्गीकरण केले जाते.. संकलित करण्यात आलेल्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती तसेच जैविक खत निर्मिती केली जाते. सुक्या कचऱ्याचे उपयोगानुसार विविध प्रकारात वर्गीकरण करून त्याची विक्री केली जाते. शहरातील बाजारपेठ, मुख्य रस्ते या ठिकाणी नियमितपणे स्वच्छता करण्यात येते.शहरातील सार्वजनिक शौचालयांची नियमितपणे देखभाल दुरुस्ती करून स्वच्छता राखण्यात येते. शहरातील सार्वजनिक विहिरी, तलाव यांची साफसफाई करून सुशोभिकरण करण्यात आले आहे. शहरातील गटारे, व्हाळी यांची नियमितपणे स्वच्छता करण्यात येते. शहरांमध्ये सांडपाणी व मैलापाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केले जाते. वर्षभरात आयोजित स्वच्छता मोहिमा, स्वच्छता जनजागृतीपर विविध कार्यक्रम व यामध्ये स्वच्छताप्रेमी वेंगुर्लेवासियांचा मिळणारा सहभाग या सर्वामुळे स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये घवघवीत यश प्राप्त झाले आहे. मुख्याधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, नगर परिषद अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता दूत, सामाजिक संस्था व नागरिक यांच्या सहकार्यातून हे यश प्राप्त झाले आहे, असे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सांगितले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!