🟥 निर्वाह भत्त्याची रक्कम वजा करून उर्वरित शुल्क कॉलेजात जमा करा!
🟥 समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांचे आवाहन
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज: कोकण लाईव्ह
🎴मालवण,दि ०६:-केंद्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना केंद्रीय मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या १७ मार्च २०२२ व ७ जुलै २०२३ या शासन निर्णयात नमूद केले अनुसूचित आहे. त्यानुसार जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची ६० टक्के हिस्स्याची रक्कम महाडीबीटी प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना अनुज्ञेय असलेल्या निर्वाह भत्त्याची रक्कम वजा करून. उर्वरित शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, इतर परतावा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालयाला सात दिवसांच्या आत जमा करण्यांचे निर्देश दिले आहेत.गेल्या काही दिवसांपासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीची २०२१-२२ २०२२-२३ वर्षातील केंद्र शासनाची ६० टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यात अशी रक्कम जमा झाली आहे अथवा काही दिवसांत जमा होणार आहे, अशा विद्यार्थ्यांनी त्या रकमेतून निर्वाह भत्त्याची ६० टक्के रक्कम वजा करून उर्वरित रक्कम महाविद्यालयात जमा करावी, असे आवाहन शिष्यवृत्ती पात्रताधारक विद्यार्थ्यांना समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे. त्याप्रमाणे कार्यवाही न केल्यास त्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्याची राहील, याची नोंद घ्यावी, असे नमूद केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

