🟥 बांदा श्री वाळकेश्वर मंदिरात पराब उत्सव उत्साहात..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-०६:- बांदा येथिल श्री वाळकेश्वर मंदिरात वाळके परिवाराचे वार्षिक देवकार्य असलेला पराब उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री बांदेश्वर भुमिका पंचायतन येथे वंदन करुन या उत्सवाचा आरंभ झाला. देवता आवाहन,लघुरुद्र,आरती,महाप्रसाद,कुंकुमार्चमन,दीपोत्सव, वनभोजन,कौलप्रसाद,वार्षिक सभा आदींसह विविध कार्यक्रम या दोन दिवसात संपन्न झाले.या सोहळ्यासाठी महाराष्ट्र,गोवा,कारवासह विविध भागातून वाळके परिवाराचे सदस्य उपस्थित होते.भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

