कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

निरवडे आरोग्य केंद्र डॉक्टरविना

*🟥निरवडे आरोग्य केंद्र डॉक्टरविना*

*🟥समुदाय आरोग्य अधिकाऱ्याकडे ‘चार्ज’ : पेशंट परतले*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.२५:*
निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमणूक असलेले दोन्ही डॉक्टर रविवारी ड्युटीवर हजर नसल्याने उपचारासाठी आलेल्या अनेक रुग्णांना माघारी परतावे लागले. राठोड नामक एका समुदाय आरोग्य अधिकाऱ्यावर ओपीडीची जबाबदारी दिल्याचा धक्कादायक प्रकार तेथे पुढे आला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवाची पर्वा नसलेल्या अशा संबंधित डॉक्टरवर प्रशासनाने चौकशी करून कारवाई करावी. अन्यथा पंचक्रोशीतील ग्रामस्थांना घेऊन आंदोलन छेडू, असा इशारा निरवडेतील सामाजिक कार्यकर्ते विकास गावडे यांनी दिला.निरवडे येथील प्रगतशील शेतकरी उत्तम परब यांची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारासाठी रविवारी सकाळी नऊ वाजता विकास गावडे, भूषण पेडणेकर शंकर सावंत, सुशांत गावडे हे निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले. परंतु त्या ठिकाणी गेल्यावर आरोग्य केंद्राची जबाबदारी असलेले डॉ. विक्रम मस्के आणि डॉ. सौ. लंबे त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली असता दोघेही बाहेर गेल्याचे त्यांनी सांगिलले.

*चौकशीअंती कारवाई करा, अन्यथा आंदोलन !*

दरम्यान, त्या ठिकाणी राठोड नामक व्यक्तीने आपण तपासणी करतो असे सांगून उत्तम परब यांना औषधे लिहून दिली. मात्र, संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांची त्यांनी चौकशी केली असता आपण मित्र म्हणून या ठिकाणी आल्याचे सांगितले, एखादा आरोग्य कर्मचारी अशाप्रकारे रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे लिहून देतो, हे धक्कादायक असल्याने विकास गावडे यांच्यासह सोबत असलेल्यांनी आरोग्य यंत्रणेला फोनाफोनी सुरू केली एवढ्यात त्या ठिकाणी डिसिल्व्हा नामक महिला डॉक्टर आल्या, त्यांनी उत्तम परब त्यांची तपासणी केली. यावेळी त्यांनी मला फोन आल्याने आपण या ठिकाणी तपासणीसाठी आल्याचे सांगितले. एकूणच हा सगळा प्रकार लक्षात घेता चुकीचा असल्याने एखाद्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो, अशी नाराजी गावडे यांनी व्यक्त केली. रविवार असला तरी संबंधित डॉक्टरनी येथे हजर असणे गरजेचे आहे. नऊ ते बारा या वेळेत तब्बल दहा ते बारा पेशंट परतून गेले याला जबाबदार कोण? त्यामुळे संबंधितांवर चौकशीअंती कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सोबत घेऊन याबाबत आवाज उठवू प्रसंगी आंदोलनही छेडू, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, याबाबत डॉ. विक्रम मस्के यांना विचारले असता ते म्हणाले, समुदाय आरोग्य अधिकाऱ्याकडे जबाबदारी देऊन आपण बाहेर गेलो होतो. समूदाय आरोग्य अधिकारी रुरण तपासणी करू शकतात. रविवारी कामानिमित्त बाहेर पडू शकतो. एखाद्यावेळी अत्यवस्थ रुग्ण आल्यास त्याच्यावर उपचार करण्याची जबाबदारी आमची असते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!