कुडाळकोकणमहाराष्ट्र

पिंगुळीत गोवा बनावटीची दारू जप्त

*🟥पिंगुळीत गोवा बनावटीची दारू जप्त*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कुडाळ, दि.२५:* पिंगुळी – म्हापसेकर तिठा येथे कुडाळ पोलिसांनी छापा टाकून ४५ हजार २०० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली. तसेच याप्रकरणी संदीप चंद्रकांत गावडे (३८ रा. पिंगुळी – नवीवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई शनिवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी स्वप्नील जगन्नाथ चव्हाण यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. पिंगुळी – म्हापसेकर तिठा येथे विनापरवाना गोवा बनावटीची दारू विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कृष्णा परुळेकर, दयानंद चव्हाण व स्वप्नील चव्हाण त्या परिसरात गेले. तेथील सिद्धिविनायक कोल्ड्रिंक्सच्या पाठीमागील मोकळ्या जागेत दारू विक्री सुरू होती. तेथे असलेला संदीप चंद्रकांत गावडे याच्याकडील सिमेंटच्या पिशवीची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा त्यांना त्या पिशवीत दारूच्या बाटल्या आढळल्या. यामध्ये बुलेट ७७ व ओल्ड कॅश्यु फेनीच्या १६ हजार ८०० रुपये किंमतीच्या ८४ बाटल्या, हायवर्ड, फाईन विस्की १४ हजार रुपये किमतीच्या ७० बाटल्या, बॉबस लेमन व्होडका ९ हजार ६०० रूपये किमंतीच्या ४८ बाटल्या, देशी दारू टेंगोच्या ४ हजार ८०० रुपये किंमतीच्या ४८ बाटल्या असा ४५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी संदीप गावडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कुडाळच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली परुळेकर तपास करीत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!