महिलांना योग्य सेवा न देणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञाची नियुक्ती रद्द करा आमआदमी पक्षातर्फे निवेदनाद्वारे मागणी
*🟥महिलांना योग्य सेवा न देणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञाची नियुक्ती रद्द करा आमआदमी पक्षातर्फे निवेदनाद्वारे मागणी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.२५:* येथील उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ गरोदर मातांवर उपचार न करता त्यांना विनाकारण त्रास देण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. याबाबत आमच्याकडे अनेक महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यांच्या वागणुकीचा त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. परिणामी, त्यांची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी आणि त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमआदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर व लीगल सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप वंजारे यांनी केली आहे. उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. किर्लोस्कर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येथील उपजिल्हा रुग्णालय हे मध्यवर्ती असल्याने मोठ्या प्रमाणात गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयात डॉ. ज्ञानेश्वर सोडल, डॉ. सी. एम. शिकलगार या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांनी चांगली सेवा देत रुग्णालयाचे नावलौकीक वाढवले होते. सध्या कार्यरत स्त्रीरोगतज्ज्ञ नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत कंत्राटी पद्धतीने सेवेत असूनदेखील उपचार करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. महिला रुग्णांना स्वतः तपासणी न करताच ओरोस किंवा कुडाळ या सरकारी रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब महिलांना नाईलाजाने खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. गरोदर महिलांना घाबरवून सिझेरियन करावे लागेल असा सल्ला दिला जातो तसेच उपचार आपल्या खाजगी दवाखान्यात करावे, असा आग्रह असतो. तरी त्यांची खातेनिहाय चौकशी करून नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत कंत्राटी नियुक्ती रद्द करावी. त्याजागी कायमस्वरुपी किंवा कंत्राटी पद्धतीने स्त्रीरोगतज्ञांची नियुक्ती करण्यात यावी. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर लोकशाही पद्धतीने आम आदमी पार्टी सिंधुदुर्गच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे म्हटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

