कोकणदेवगडमहाराष्ट्र

टेंबवली येथे माकडांच्या उच्छादाने शेतकरी त्रस्त

टेंबवली येथे माकडांच्या उच्छादाने शेतकरी त्रस्त

देवगड : देवगड तालुक्यातील

टेंबवली येथे माकडांच्या उच्छादाने ग्रामस्थ व शेतकरी हैराण झाले आहे. माकडाच्या उच्छादाने घरांच्या छपरांसह केळी बागायती, आंबा कलमे व बागायतींचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत प्रशासनाला कळवूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने शेतकरी व ग्रामस्थ हैराण झाले आहेत. टेंबवली सारंगवाडी येथील राजेंद्र सारंग यांनी सांगितले की, माकडांच्या उपद्रवामुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. माकडे घरावर मोठमोठ्यांनी धावत असल्याने घरांची कौले फुटणे, पत्रे फुटण्याचे प्रकार होत आहेत. तसेच माड बागायतीमध्ये माडांवरील नारळ, सुपाऱ्या केळी तसेच पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आंबा कलमांवर असलेला मोहर तसेच होत असलेल्या आंब्या लहान फळाचे माकडांच्या उपद्रवामुळे नुकसान होत आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना करून माकडांच्या उपद्रवापासून ग्रामस्थांचे होत असलेले नुकसान थांबवावे, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!