कोकणमहाराष्ट्रमालवण

अशोक सावंत यांच्यासह दहा राणे समर्थकांची निर्दोष मुक्तता

*🟥अशोक सावंत यांच्यासह दहा राणे समर्थकांची निर्दोष मुक्तता*

*🟥महावितरणाच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्यासाठी काढला होता मोर्चा भरती प्रक्रिया थांबविल्याचा होता आरोप*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण, दि.१८:* महावितरणच्या कामगार भरतीत कंत्राटी कामगारांसह स्थानिकांना प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी रत्नागिरीच्या महावितरण कार्यालयावर एक हजार लोकांचा मोर्चा काढून भरती प्रक्रिया थांबविल्याच्या आरोपातून कामगार नेते अशोक सावंत यांच्यासह १० राणे समर्थकांची रत्नागिरीचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अंबाळकर यांनी निर्दोष मुक्तता केली. अन्य आरोपींमध्ये संदीप शिबराम सावंत चिपळूण, सचिन माजळकर लांजा, सागर उर्फ बाळा दवंडे, अशोक वाडेकर, अमेय मसुरकर, सेहेताब साखरकर, आय. टी. मयेकर आदींचा समावेश होता. या सर्वांवर सीआरपीसी १४३, १४५, १४७, १४९, ३४१, ३५३, १८९, ५०४, ५०६, १४० नुसार दोषारोप ठेवण्यात आले होते. महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदाच्या कामगार भरतीत कंत्राटी कामगारांसह स्थानिक मुलांनाही रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी २०१३ मध्ये तत्कालीन खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राणेसमर्थक आक्रमक झाले होते. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हयात परजिल्हयातील कामगारांची भरती थांबविण्यात आली होती. मात्र, रत्नागिरी जिल्हयात ही भरती सुरू असल्याचे समजताच नीलेश राणे यांच्या प्रेरणेतून २०१३ साली राणे समर्थकांनी कंत्राटी कामगार आणि
स्थानिक मुलांना सोबत घेऊन रत्नागिरीच्या महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी राणेसमर्थक असलेल्या या सर्वांनी एक हजार लोकांसह रास्ता रोकोही केला होता. त्यामुळे परजिल्हयातील कामगारांची भरती होऊ शकली नव्हती. या आंदोलन प्रकरणी राणे समर्थक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रत्नागिरी जिल्हा न्यायालयात २०१३ पासून याची सुनावणी सुरू होती. या दोषारोपातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. आरोपींतर्फे अॅड. योगेंद्र गुरव, अॅड. सचिन थरवळ, अॅड. लीना गुरव, अॅड. अपूर्वा करंदीकर, अॅड. स्वाती शेडगे यांनी काम पाहिले. यापूर्वी महावितरण कंपनीच्या कामगार भरतीत पराजिल्हयातील कामगारांचा समावेश असायचा. त्यामुळे तत्कालीन खासदार नीलेश राणे यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयात केवळ स्थानिक मुलानांच सामावून घेण्याची मागणी करून २०१३ मध्ये मोठे आंदोलन छेडले. त्यावेळी दोन्ही जिल्हयात कामगार भरतीसाठी आलेल्या बाहेरील उमेदवारांना पिटाळून लावण्यात आले. परिणामी आजही सिंधुदुर्ग जिल्हयात स्थानिक मुलांनाच भरती प्रक्रियेत सामावून घेण्यात येत आहे. यापुढील काळातही नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची संघटना कटीबद्ध असल्याची प्रतिक्रिया अशोक सावंत यांनी व्यक्त केली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!