गवारेड्यांच्या वावराने ग्रामस्थ भयभीत
*🟥गवारेड्यांच्या वावराने ग्रामस्थ भयभीत*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कुडाळ, दि.१८:* पाट-परूळे मार्गावर माड्याचीवाडी पट्ट्यात दिवसेंदिवस गवारेड्यांचा वावर वाढला असून दिवसाढवळ्या गवारेड्यांचा कळप ग्रामस्थांना दिसत आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चार दिवसांपूर्वीच या मार्गावर माड्याचीवाडी येथे गवारेड्याने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघे युवक गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे असा मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन वन विभागामार्फत गवारेड्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ✓ तेथील ग्रामस्थ करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात गवारेड्यांचा वावर वाढला आहे. या परिसरात आठ-नऊ गवारेडे कळपाने दिवस-रात्र फिरताना दिसतात. या भागात उन्हाळी भातशेती, भाजी मोठ्या प्रमाणात केली जाते. या भात शेतीचेही गवारेडे नुकसान करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दोन महिन्यांपूर्वी एका गवारेड्याने माड्याचीवाडी हायस्कूल येथे बोलेरो पिकअपला धडक दिली. होती. या अपघातात गाडीचे नुकसान झाले होते. वन विभागाने या गवारेड्यांचा बंदोबस्त करावा, अंशी मागणी तेथील ग्रामस्थ करीत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

