पोलीस पाटील परीक्षा पूर्वतयारी कार्यशाळा उद्या
*🟥पोलीस पाटील परीक्षा पूर्वतयारी कार्यशाळा उद्या*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.१४:* रेल्वे स्थानकानजीकच्या वाळकेश्वर मंगल कार्यालय, मुडे डोंगरी येथे शुक्रवार, १५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत पोलीस पाटील परीक्षा पूर्वतयारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा सर्व परीक्षार्थीसाठी खुली व मोफत आहे. कार्यशाळेचा लाभ कणकवली-देवगड-वैभववाडी तालुक्यातील सर्व परीक्षार्थीनी घ्यावा, असे आवाहन ओबीसी आरक्षित समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी केले आहे. जिल्हयातील पोलीस पाटील नियुक्तीची प्रक्रिया महाराष्ट्र शासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. यापैकी कणकवली उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कणकवली, देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यांत मिळून एकूण १३४ पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा येत्या रविवारी होणार आहे. या पदासाठी सुमारे पाचशेहून अधिक युवक- युवतींनी अर्ज दाखल केल्याचे समजते. या सर्व उमेदवासकडून या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी आरक्षित महासंघातर्फे मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. हे पोलीस पाटील पद भरतीसाठीच्या लेखी परीक्षेचे स्वरुप व प्रश्नपत्रिका सोडविताना घ्यायची काळजी, अपेक्षित प्रश्न या विषयीचे मार्गदर्शन करण्यासाठी निवृत्त गटविकास अधिकारी विजय चव्हाण, निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद वळंजू आणि पोलीस पाटील संघटनेचे अनुभवी पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनाही महासंघाने निमंत्रित केले आहे. अधिक माहितीसाठी महासंघाचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

