कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

विनयभंगप्रकरणी संशयिताला १६ पर्यंत पोलीस कोठडी

*🟥विनयभंगप्रकरणी संशयिताला १६ पर्यंत पोलीस कोठडी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओरोस, दि.१४:* माहिती तंत्रज्ञान सुविधांचा आधार घेत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी साईप्रसाद पांडुरंग कामटेकर (वय-३०, रा. कवठणी-सावंतवाडी) याला जिल्हा विशेष न्यायाधीश संजय भारुका यांनी १६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. संशयित आरोपीने पीडित अल्पवयीन मुलगी हीच्याशी तिच्या मोबाईल नंबरवर तसेच वेगवेगळ्या नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन संपर्क साधून तिला धमकी देत तिचे विवस्त्र फोटो व व्हीडिओ व्हॉट्सअॅप व इन्स्टाग्राम या सोशल मिडीयावर पाठविण्यास भाग पाडले. तसेच ते फोटो व्हायरल केले. ऑगस्ट २०२२ ते १२ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ही घटना घडली असल्याची तक्रार पीडित अल्पवयीन मुलीने २३ नोव्हेंबर २०२३ रोजी कुडाळ पोलिसात दिली होती. गुन्हा दाखल करुन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या तपासात राहूल या नावाने पीडित मुलीशी संपर्क साधून एक इन्स्टाग्राम अकाऊंट क्रीएट केल्याची कबुली संशयिताने पोलिसांना दिली. ( दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला १३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी अटक करून सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा विशेष न्यायालयात हजर केले होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!