कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

वाफोलीत विकसित भारत संकल्प यात्रेतून जनजागृती

*🟥वाफोलीत विकसित भारत संकल्प यात्रेतून जनजागृती*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 बांदा, दि.१४:* समाजातील सर्वसामान्य घटकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. त्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. यात्रेचा जनजागृती रथ मंगळवारी वाफोली गावामध्ये आला असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी उपस्थित राहून आपल्या योजना गावकऱ्यांना समजावून सांगितल्या आहेत. यासाठी ग्रामस्तरावर काम करणाऱ्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केले. यावेळी सरपंच उमेश शिरोडकर, देवस्थान समिती अध्यक्ष विलास
गवस, उपसरपंच विनेश गवस, ग्रा. सदस्य साक्षी शिरोडकर, मंजुळा शेगडे, गौरी गवस, पोलीस पाटील आना गवस, माजी सरपंच मारुती गवस, बबन गवस, कृषी सहाय्यक सौ. वसकर, आरोग्य सेविका मोरे, आशा सेविका ज्योती सावंत, ऋतुजा गवस, ग्रामपंचायत कर्मचारी संदीप धुरी, लवू कांबळे, ग्रामसेवक प्रसाद ठाकुर यांनी सुयोग्य नियोजन करून कार्यक्रम तसेच पंतप्रधान मोदी यांचा संवाद कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने गटविकास अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रत्येक पात्र लाभार्थ्यांस या उपक्रम कालावधीत विविध केंद्र शासनासह राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी वाफोली सरपंच शिरोडकर व उपसरपंच गवस प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी द्रोणच्या सहाय्याने पिकांवर औषध फवारणी कशी करावी? याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!