कुडाळकोकणमहाराष्ट्र

माठेवाडा घरफोडीतील दागिन्यांचाही लागला शोध

*🟥माठेवाडा घरफोडीतील दागिन्यांचाही लागला शोध*

*🟥पाच तोळ्यांचे दागिने तारण म्हणून ठेवले फायनान्स कंपनीत*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कुडाळ, दि.१४:* कुडाळ शहरातील घरफोडी प्रकरणातील संशयित अनंत उर्फ अक्षय अशोक म्हाडेश्वर (रा. कुडाळ पानबाजार, क्षितिज अपार्टमेंट) याच्याकडून माठेवाडा येथील चोरी प्रकरणातील १५ हजार रुपये हस्तगत केल्यानंतर आता या चोरीतील पाच तोळे सोन्याचाही शोध घेण्यात कुडाळ पोलिसांना यश आले आहे. त्याने सोन्याचे दागिने एका गोल्ड लोन फायनान्स कंपनीत तारण म्हणून ठेवले होते. दरम्यान, संशयित अक्षयला बुधवारी येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी देण्यात आली. कुडाळ-माठेवाडा येथील प्लाझा संकुलातील श्रद्धापांडुरंग श्रीकृष्ण
गवळी यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप बनावट चावीने उघडून अक्षयने आतील कपाटामधील रोख रक्कम व सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने मिळून सुमारे १ लाख तीस हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला होता. ही चोरी आपण केल्याची कबुलीही त्याने पोलिसात दिली होती. त्यामुळे त्याला अटक करून येथील न्यायालयात हजर केले होते. तेव्हा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अश्विनी बाचुलकर यांनी त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनायक केसरकर तपास करीत आहेत. तपासात अक्षयने आपण चोरलेले १५ हजार रुपये मित्राकडे दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी ही रक्कम त्याच्या मित्राकडून हस्तगत केली. दरम्यान, यातील सोन्याच्या दागिन्यांचाही शोध घेण्यात पोलिसांना यश आले. यात चोरलेले सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने अक्षयने कुडाळ येथील एका गोल्ड लोन फायनान्स कंपनीत तारण ठेवून पैसे घेतले होते. याबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलीस आता संबंधित गोल्ड लोन फायनान्स कंपनीमधून हे दागिने ताब्यात घेणार आहेत त्यामुळे याही चोरीतील सर्वच मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश येणार आहे.. दरम्यान, अक्षयची पोलीस कोठडीची मुदत आज संपल्याने त्याला येयील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!