कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

पदवीधर मतदार संख्या १७ हजार ७२८

*🟥 पदवीधर मतदार संख्या १७ हजार ७२८*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्ग,दि-१४:-* सिंधुदुर्गनगरी महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीमध्ये आणखी अडीच हजारांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता पदवीधर मतदारांची संख्या १७ हजार ७२८ एवढी झाली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत तब्बल १२ हजार ४२० पदवीधर मतदारांची वाढ झाली आहे. सिंधुदुर्गात तिपटीहून अधिक मतदारांची वाढलेली संख्या आगामी निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांची ७ जुलै २०२४ रोजी मुदत संपत आहे. तत्पूर्वी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपासून मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येत. आहे. यापूर्वी जिल्ह्यात ५ हजार ३०८ मतदार होते. परंतु, पूर्वीचे मतदार असले, तरी पूर्वीची मतदार यादी रद्द करून पुन्हा नव्याने मतदार नोंदणी करणे आवश्यक होते. त्यामुळे मतदार पुन्हा नोंदणी करण्यास उत्साह दाखवतील की नाही, अशी शंका होती. त्यामुळे मतदार नोंदणी सुरू झाली, महिनामरात फक्त तीन हजार मतदारांचीच नोंदणी झाली होती. मात्र, त्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी मतदार नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला व ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही पद्धतीने मतदार नोंदणी करायला सुरुवात केली. त्यामुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत १५ हजार १५४ एवढी मतदार नोंदणी झाली होती. त्यानंतर आणखी २ हजार ५७४ मतदारांची वाढ झाली. त्यामुळे पदवीधर मतदारांची संख्या १७ हजार ७२८ झाली आहे. यापूर्वी झालेल्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत फक्त ५ हजार ३०८ मतदार होते, आता ती एकूण मतदारांची संख्या १७ हजार ७२८ पर्यंत गेली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल १२ हजार ४२० मतदार संख्या वाढली आहे. ३० डिसेंबर २०२३ रोजी ही अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्हयात तिपटीहून अधिक मतदार संख्या वाढल्याने आगामी निवडणुकीत सिंधुदुर्गातील मते निर्णायक ठरणार आहेत.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!