🟥 दीपक केसरकर म्हणजे कामापुरती मामा ; जयेंद्र परूळेकर
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : नाना धोंड
🎴सावंतवाडी, दि-१४: मंत्री दीपक केसरकर हे कामा पुरती मामा आहेत. आज ते बाळासाहेब ठाकरेंवर टीका करत आहेत. उद्या भाजपमध्ये त्यांच्या मनासारखे झाले नाही तर त्या ठिकाणी सुद्धा ते टीका करताना दिसतील, असा टोला ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयंत परूळेकर यांनी आज येथे लगावला. विधानसभा अध्यक्षांसमोर झालेल्या साक्षी दरम्यान बाळासाहेब हे हुकूमशहा होते, असा दावा केसरकर यांनी केला होता. याला श्री. परूळेकर यांनी प्रत्युत्तर दिले. एकीकडे पक्षात बाळासाहेबांचा फोटो वापरायचा आणि दुसरीकडे त्यांच्यावर टीका करायची, ही कुठची नैतिकता? असा सवाल परूळेकर यांनी केला. केसरकर यापुढे भाजपमध्ये दिसतील, असेही ते म्हणाले. आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत.

