कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर महाराष्ट्र कोकण भुषण पुरस्काराने सन्मानीत

🟥 सुप्रसिद्ध अभिनेते विश्वजीत फडके यांच्या हस्ते मालवणच्या सुपुत्राचा सन्मान..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवडी, दि-११:- विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असताना तळागाळातील बरेच मान्यवर फक्त कार्य करतात . त्यांना कोणत्याही पुरस्काराची आवश्यकता नसते . मानव सेवेचे व्रत जपत असताना समाजात विविध अंगानी काम करणारे व्यक्ती असतात . आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो यानुसार सतत कोणत्याही फळाची अपेक्षा न करता नि : स्वार्थ वृत्तीने कार्य करीत राहणे म्हणजे जीवनाचा खरा अर्थ असतो . अशाच विचारातून सिंधू सेवा आश्रम , महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेने विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा अमूल्य वेळ खर्च करून समाज रचणा्या ध्येयवादी आणि असामान्य व्यक्तींना समाजात वेगळ्या वाटेने चालणाऱ्या कार्याविरांचा सन्मान व्हावा आणि त्यांचे कार्य सह्याद्री प्रमाणे मोठे व्हावे या उद्देशाने पुरस्कार प्रदान करण्यात येतात .

यंदा सन 2023 या वर्षीचा महाराष्ट्र कोकण भुषण पुरस्कार मालवण तालुक्यातील क्रियाशील व कार्यतत्पर युवक ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांना जाहीर करण्यात आला . महाराष्ट्राच्या विकासात सतत भरीव योगदान देऊन इतिहास रचणा्या या कार्यविराला लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे. स्वतःच्या शिक्षणाबरोबरच सामाजिक व शैक्षिणक क्षेत्रात कार्य करीत असतो . गरजू विद्यार्थ्यांना शैक्षिणक साहित्यासाठी आर्थिक मदत , तरुण व वृध्द व्यक्तींना व्यसन मुक्ती साठी वैयक्तिक पातळीवर जनजागृती मोहीम राबविणे ,आत्मनिर्भर भारत के अंतर्गत युवकांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण , जलजागरण अभियांनामार्फत महाविद्यालयामध्ये पाण्याचे महत्व समजण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन , विविध राष्ट्रीय दिवस महाविद्यालयामध्ये साजरे करून विद्यार्थ्यांना वक्तृत्व , चित्रकला , रांगोळी , निबंध अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे, कोरोना काळात विविध प्रकारची सामाजिक कार्ये व वृध्दांसाठी वैयक्तिक पातळीवर मोफत रिक्षा सेवा , चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदतीमध्ये सहभाग , ग्रामीण भागातील वृध्द व्यक्तींसाठी वैयक्तिक पातळीवर साक्षरता मोहीम व जनजागृती , निराधार व्यक्तींना शासकीय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांना सहकार्य करणे, गड – किल्ले संवर्धनासाठी व्यापक स्तरावर जनजागृती , वृक्ष लागवड व बंधारे बांधण्यात सक्रिय सहभाग , विविध स्वच्छता मोहिमांमध्ये सहभाग , मोफत आयुष्यमान भारत कार्ड लोकांना काढून देणे , या आधी महत्वाची कागदपत्रे व मोबाईल अशा मिळालेल्या वस्तू दोन्ही व्यक्तीस देऊन प्रामाणिक पणा बद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व मालवण पोलिस निरीक्षक सोनू ओटवणेकर यांच्या कडून ऐश्वर्य चा सत्कार , बेस्ट एन. सी .सी कँँडेट म्हणून सन्मान , तसेच ग्रामीण रुग्णालय मालवण येथे कोरोना काळात सेवा केल्याबद्दल कोविड योद्धा म्हणून सन्मान , राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल 2021 पुरस्काराने सन्मानित , महाराष्ट्र सह्याद्री युवा लोकगौरव पुरस्कार 2022,, एच. एस. सी परीक्षेत तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांच्या तर्फे सन्मान , तसेच माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या तर्फे सन्मानपत्र , बी. कॉम परीक्षेत महाविद्यालयात तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल आमदार नितेश राणे यांच्या कडून सन्मानपत्र , एम.कॉम परीक्षेत विशेष प्रविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल मातृत्व आधार या संस्थेकडून सन्मान, उत्कृष्ठ ग्रंथालय वाचक म्हणून सन्मान , केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी कार्यक्रमात प्रगणक म्हणून काम , महाविद्यालयात असताना छात्रसेना प्रमुखही कार्य , ऐश्वर्य वढू आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समितीचा मालवण तालुका प्रमुख , युवा फोरम मालवण तालुका प्रमुख , नेहरू युवा केंद्र संघटन या भारत सरकारच्या संघटने मध्ये मालवण तालुका समन्वयक पदावर कार्यरत , विधी स्वयंसेवक सिंधुदुर्ग, मानवता विकास परिषद , कोंकण विकास मंच , भंडारी समाज महासंघ , युथ बीट्स फॉर क्लायमेट्स , ग्रूप नवनिर्माण , दक्ष युवक , मातृत्व आधार फाऊंडेशन , दिल्ली फोरम, इकोमेट्स ब्ल्यू विंग, नेचर क्लब, महाराष्ट्र युथ फॉर क्लायमेट ॲक्शन, अशा विविध सामाजिक संघटनांमध्ये कार्य करीत आहे . ऐश्वर्य मांजरेकर यांच्या सामाजिक शैक्षणिक व इतर क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल सिंधु सेवा आश्रम महाराष्ट्र या संस्थेने घेतली . सदर पुरस्कार माझा सिंधुदुर्ग संमेलना मध्ये प्रदान करण्यात आला . पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह , सन्मानपत्र , मानाची शाल असून सुप्रसिद्ध अभिनेते विश्वजीत फडते यांच्या हस्ते सदर पुरस्कार ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी संमेलनाध्यक्ष कायदेतज्ञ ॲड महेश कुंटे, दीपस्तंभचे अध्यक्ष देव सर, सुप्रसिद्ध अभिनेते अभय खडपकर, सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री मा. राजश्री काळे, सुप्रसिद्ध सिनेअभिनेते मा. विजय मानवतकर, प्रा . श्री . बी . एन. खरात ( संस्थापक अध्यक्ष ह्युमन राईट्स प्रेस पब्लिकेशन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला .

सामाजिक व शैक्षिणक क्षेत्रामध्ये सतत कार्यरत असणारा हा युवक नक्कीच महाराष्ट्राचा सह्याद्री होईल . ऐश्वर्य मांजरेकर यांना महाराष्ट्र कोकण भुषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्ल समाजातील विविध स्तरांसह समस्त सिंधुदुर्गवासिय व मालवणवासियांकडून त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे .

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!