🟥चोरीच्या दुसऱ्या गुन्हयात अक्षय पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
🟥कुडाळ माठेवाडा येथील फ्लॅटमध्ये केलेली चोरी
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 कुडाळ, दि.११: कुडाळ शहरातील पडतेवाडी येथील अॅक्सीस बँकेच्या मागील बाजूच्या घरफोडी प्रकरणातील संशयित अनंत उर्फ अक्षय अशोक म्हाडेश्वर (रा. कुडाळ पानबाजार, क्षितिज अपार्टमेंट) याला रविवारी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अश्विनी बाचुलकर यांनी न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर यापूर्वीच्या कुडाळ माठेवाडा येथील एका फ्लॅटमधील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरीप्रकरणी अक्षयला कुडाळ पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेतले. अॅक्सीस बँकेच्या मागील अनंत वैद्य यांचा बंद बंगला फोडून ८८ हजार रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून सुमारे १२ लाख रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी येथील न्यायालयाने अटकेत असलेल्या अक्षय म्हाडेश्वरला आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. या गुन्हयातील सर्व दागिने व ८८ हजार रुपयांपैकी ८४ हजार रुपये त्याच्याकडून कुडाळ पोलिसांनी हस्तगत केले. पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी तपास करताना चोरीचा ऐवज ताब्यात घेण्यात यश आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. व्ही. सूर्यवशी यांच्यासह प्रितम कदम, स्वप्नील
तांबे व कृष्णा परुळेकर यांचे तपासकामी सहाय्य लाभले, आज अक्षयची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली. पूर्वी गेल्या वर्षभरात शहरात झालेल्या पाच घरफोड्या आपणच केल्याची कबुली संशयित अक्षयने तपासादरम्यान पोलिसांना दिली होती. यात कुडाळ माठेवाडा येथील पांडुरंग प्लाझा संकुलातील ३० मे २०२३ रोजी निदर्शनाला आलेल्या चोरीचा समावेश होता. या गुन्हयाच्या तपासकामी कुडाळचे पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर यांनी अक्षयला न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेतले. या चोरीच्या घटनेत पांडुरंग प्लाझा संकुलातील दुसऱ्या मजल्यावरील श्रद्धा श्रीकृष्ण गवळी यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने आतील कपाटामधील पंधरा हजार रुपये रोख रकमेसह सोन्याचे दागिने मिळून ७२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. ही फिर्याद श्रीमती गवळी यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, अक्षयने ही चोरी आपणच केल्याची कबुली पोलिसांत दिली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

