🟥झाराप ते बांदादरम्यान एसटी थांबे हवेत
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.११: मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा ते झाराप या बायपासवरून एसटी बस वाहतूक सुरू केल्यास या मार्गावरील नेमळे, मळगाव, वेत्ये, सोनुर्ली या गावातील शेकडो प्रवाशांना सेवा मिळून एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. सेवा सुरू केल्यास कुडाळ, कणकवलीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांना चांगली सेवा मिळून आर्थिक, शारीरिक त्रास थांबणार आहे. यासाठी एसटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाने या मार्गाचा सर्व्हे करून काही एसटी फेऱ्या वळवाव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. सावंतवाडी बसस्थानकातून कुडाळ, कणकवली या ठिकाणी जाणाऱ्या एसटी फेऱ्या शहरातून कोलगाव, आकेरीमार्गे झाराप ते कुडाळ या चौपदरी मार्गाने सोडल्या जातात. तसेच परतीच्या वेळीही या मार्गाने येतात. मळगाव, नेमळे, वेत्ये गावातील प्रवाशांना सावंतवाडीतून पुन्हा दुसरी बस पकडून गाव गाठावे लागते. त्यांमुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड, शारीरिक त्रास सहन करावा लागतो. इन्सुली, वेत्ये, सोनुर्ली, मळगावमधील पिंपळवाड़ी, ब्राम्हणपाट, रेडकरवाडी तर नेमळे येथील धारकरवाडी, गोरख्याचे गाळू एरंडवाकवाडी, देऊळवाडी, फौजदारवाडी, कुंभारवाडी आहेत. शेकडो ग्रामस्थांना थेट कुडाळ, कणकवली या ठिकाणी जाण्यासाठी एसटीची सेवा उपलब्ध नाही. त्यांना खासगी वाहनाने सावंतवाडी किंवा झारापपर्यंत येऊन एसटी बसचा आधार घ्यावा लागत आहे. ज्याप्रमाणे झाराप ते कुडाळपर्यंत एसटी बस स्टॉप आहेत. त्याप्रमाणे नेमळे ते वेत्ये, इन्सुलीपर्यंत स्टॉप उभारून या मार्गावरून पणजी, बांदा तसेच कुडाळ, कणकवलीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या फेऱ्या वळविल्यास निश्चित या गावातील ग्रामस्थांना लाभ मिळून एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. एसटी महामंडळाने झाराप झिरो पॉईंट ते बांदा खामदेव नाकापर्यंत मार्गाचा सर्व्हे करून या मार्गावरून गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

