🟥 कणकवली शहर विकास आराखडयाबाबत सुशांत नाईक यांचा बालिशपणा..
🟥 आ.गोगावलेंचा कोट वैभव नाईक कधीही घालू शकतात ; समीर नलावडे
🟥 माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची टीका ; कणकवली शहरातील नागरिकांमध्ये गैरसमज पसरवण्यासाठी ‘ग्लोबेल्स नीती’चा वापर
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि-१०:- कणकवली शहर विकास आराखडा लोकांना विश्वासात घेवूनच केला जाणार आहे. तो आम्हीच करणार आहोत.त्यामुळे त्याचे श्रेय नाईकांनी आम्हालाच द्यावे.कणकवली शहर विकास आराखडयाबाबत सुशांत नाईक यांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे.त्यांनी आधी नगरपंचायतचा अभ्यास करावा आणि त्यानंतरच वक्तव्य करावे. मालवण आणि कणकवली या दोन शहरांमध्ये टी पी स्कीम राबविण्यात येणार आहे.नागरिकांच्या सूचना,हरकती घेवूनच अंतिम विकास आराखडा बनवला जाईल. नाईक हे कणकवली शहरातील नागरिकांमध्ये गैरसमज पसवण्यासाठी “ग्लोबेल्स नीती” वापरत असल्याची टीका माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केली.
कणकवली येथील शहर भाजपा कार्यालयात संयुक्तरीत्या आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अजय गांगण उपस्थित होते.
बंडू हर्णे म्हणाले,सुशांत उर्फ बाबू नाईक यांनी शब्दांचा घोळ करून नागरिकांचा दिशाभूल चालविली आहे.त्यांचे वय ४० वर्षे असून नगरपंचायत मध्ये नगरसेवक म्हणून १५ वर्षे काम केले आहे.तरीही बालिश बाबू नाईक हे विकास आराखडा मुद्द्यावर बोलताना दिसत आहेत.विकास आराखडा हा कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांना विश्वासात घेवून केला जाणार आहे.आता एल. यु.नोटीस आणि त्यानंतर पी एल यू प्रसिद्ध केला जाईल.त्यावर नागरिकांच्या सूचना, हरकती मागवल्या जातील. त्यावर सर्व लोकांच्या सुनावणी घेतली जाईल,त्यावेळी म्हणणे एकूण घेतले जाईल.त्यानंतर अंतिम आराखडा लोकांच्या सहभागाने मंजूर केला जाईल.कणकवलीकरांच्या विश्वासाला आम्ही तडा जावू देणार नाही.
सरकारच्या धोरणानुसार सुधारित शहरे राज्यात निर्माण होणार आहेत,त्या त्या ठिकाणी टी पी स्कीम राबवावी.त्यानूसार नियोजित शहर करण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि कणकवली या दोन शहरामध्ये टी पी स्कीम करण्याबाबत शासनाने मंजूरी दिली आहे.ही टी पी स्कीम म्हणजे काय आहे ? ते नाईक यांनी समजून घ्यावे त्यामध्ये ग्रीन झोन आणि काही भूखंड आरक्षण विभाग असतील तर २० हेक्टर क्षेत्र जमीन मालक,नागरिक एकत्र येत नगरपंचायतकडे सदर मिळकती विकसित करण्यासाठी समत्ती दिली तरच त्याचा प्रस्ताव करायचा आहे. सर्व भूखंड एकत्रित बिनशेती करत प्रशस्त रस्ते, गटार आणि पाणी व्यवस्था होईल.त्यात ग्रीन झोन मधून सदर भूखंड यलो झोन होणार आहे.हे विकसित करण्याचे काम कणकवली नगरपंचायत करणार आहे.त्यामूळे जमिनींच्या किमतीचे चार ते पाच पटीने भाव वाढतील.या विकास आराखडा प्रक्रियेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा.शहरातील जमीन मालकांना मदत आम्ही करणार आहोत.विरोधी पक्ष आणि सर्वांनीच नागरिकांना मदत करण्याची गरज आहे. हे करायचे सोडून बाबू नाईक हे लोकांची दिशाभूल करीत आहेत.त्यांना मोठ मोठी स्वप्न पडत आहेत.त्यांनी पहिल्यांदा नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी. नंतर नगरपंचायत बाबत दिवे पाजळावे,असा टोला समीर नलावडे,बंडू हर्णे यांनी लगावला.
बाबू नाईक यांनी टीका करताना विचार करावा. कणकवली शहर विकास आराखड्याबाबत त्यांनी जो उल्लेख केला, तो चुकीचा आहे. ज्यावेळी कणकवली शहराचा डी पी प्लॅन समोर येईल,त्यावेळी नाईकांनी आम्हाला त्याचे श्रेय द्यावे.आपली भूमिका कायम ठेवावी.बाबू नाईकांच्या याच बालिशपणा मुळे आ.वैभव नाईक हे त्यांना बाबू म्हणतात. राजकारणातील त्यांना खूप काही कळत असेल असे आम्हाला वाटत होते,मात्र तसे नाही.नुसते पत्रकार परिषदेत बोललं मग झालं नाही.त्यानी अगोदर नगरपंचायतचा अभ्यास करावा.आम्ही वाट पाहतोय, नगरपंचायत निवडणूकीत नगराध्यक्ष पदाची बाबू नाईक यांनी निवडणूक लढवावी.”ग्लोबेल्स नीती” वापरुन वैभव नाईक यांनी अनेकदा कुडाळ मध्ये मते मिळवली आहेत,कणकवलीत ते शक्य नाही.विधानसभा अधिवेशनात शिवसेना आ.भरत गोगावले यांनी वैभव नाईक यांना थेट निमंत्रण दिले आहे.त्यांची तयारी असेल तर माझा कोट नक्कीच वैभव नाईक यांच्या अंगावर पडेल,असेही माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी म्हटले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

