कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 रानडुकरांची व साळींदराची शिकार करून इन्स्टाग्राम वर व्हिडिओ व्हायरल करणारा आरोपी वन विभागाच्या ताब्यात..

🟥 सावंतवाडी वन विभाग व फिरतेपथक सांगली यांची संयुक्त कारवाई..!

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-११:- रानडुक्कर व साळिंदर या वन्यप्राण्यांची निर्दयपणे शिकार करून इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर व्हिडिओ अपलोड करणाऱ्या रोहित कोळी नामक आरोपीला वन विभागाने सांगली मधून ताब्यात घेतले.

याची हकीकत अशी की आपल्या rohit_koli_shikarvala या इन्स्टाग्राम अकाउंटवर रानडुक्कर तसेच साळींदर यांची शिकार करून व्हिडिओ व्हायरल करणारा आरोपी रोहित कोळी याला अटक करण्यासाठी त्याचा माग काढत सावंतवाडी वन विभागाची टीम याबाबत कसून तपास करत होती. या तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सदरचा आरोपी हा सांगली येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सदर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सावंतवाडी वन विभागाची टीम रवाना झाली. यानुसार फिरते पथक सांगली यांना सोबत घेऊन सापळा रचण्यात आला व त्यानुसार सोलापूर-सांगली हायवेवर रोहित कोळी व इतर 5 आरोपी यांना 10 जिवंत रानडुकरांसह संयुक्त कारवाई करून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सदरच्या कारवाई मुळे जिवंत रानडुकरांची तस्करी करून मांसाची विक्री करणाऱ्या टोळीच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला.

सावंतवाडी उपवनसंरक्षक श्री.नवकिशोर रेड्डी यांचेमार्फत वन विभागाकडुन सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही समाज माध्यमावर वन्यप्राण्यांच्या शिकारीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविषयी वन विभागाला तात्काळ माहिती द्यावी. शिकारीसारख्या अवैद्य कृत्याचे कोणत्याही स्वरूपात समर्थन करू नये. वन विभागाचे सायबर सेल देखील अशा आक्षेपार्ह पोस्ट बाबत दखल घेत असून याबाबत समाजमाध्यम वापरकर्त्यांनी सजग रहावे.

सदरची कारवाई ही मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर(प्रा.) श्री.आर. एम. रामनुजम, उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री. एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडी डॉ. सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, फिरतेपथक सांगली वनक्षेत्रपाल महंतेश बगले, मानद वन्यजीव रक्षक श्री. अजितकुमार पाटील, पोलिस हवालदार गौरेश राणे, वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक प्रमोद जगताप, महादेव गेजगे, प्रकाश रानगिरे, वाहनचालक रामदास जंगले तसेच मेळघाट सायबर सेलचे वनरक्षक आकाश सारडा यांच्या पथकाद्वारे यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!