कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 ‘सेतू’ चा सर्व्हर डाऊन, नागरिकांची प्रचंड गैरसोय..

🟥 साध्या साध्या कामांसाठी ५ ते ६ वेळा विद्यार्थी व वयस्कर व्यक्तींना माराव्या लागतात फेऱ्या..

🟥 शासनाने तात्काळ यावर योग्य तो तोडगा काढावा ; सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र सावंत

🎥 Kokan Live Breaking News

🎴दोडामार्ग, दि-०९:- सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून एका छताखाली सर्व सुविधा नागरिकांना मिळतात. डोमिसाइल प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, प्रतिज्ञा पत्र आदी सेवा या केंद्रांद्वारे दिल्या जातात. या सेवा केंद्रांमध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक येतात. त्यामुळे रांगा लागतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोडामार्ग सेतू सुविधा केंद्रात सर्व्हर डाऊन असल्याने कर्मचाऱ्यांबरोबरच या केंद्रात विविध कामांसाठी येणाऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. नागरिक स्वत:चा नंबर लावण्यासाठी सेतू केंद्राच्या खिडकीसमोर चढाओढ करताना दिसतात.

सर्व्हर डाऊन मुळे तालुक्यातील सेतू केंद्राचे काम हे अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. त्यांच्या कामा बाबत विद्यार्थी तसेच वयोवृद्घां कडून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे. मांगेली, खोक्रल, वीजघर, केंद्रे,हेवाळे, केर, भेकुर्ली, कोलझर अश्या लांबा लांब म्हणजे जवळ जवळ २५ ते ३० किलोमीटर प्रवास करून विद्यार्थी व वयस्कर मंडळी आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी तसेच शासना कडून मिळणार्‍या सुविधांसाठी व दाखल्यांसाठी सेतू केंद्रात येतात मात्र येवढा लांबचा प्रवास करून खर्च करून येवून सुद्धा त्यांना सेतू केंद्रातून काम झाल नाही असे एकावे लागते. साध्या साध्या कामांसाठी त्यांना सेतू केंद्रात ५ ते ६ वेळा फेऱ्या माराव्या लागतात ही एक मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

त्यामळे शासनाने विद्यार्थी तसेच वयोवृद्धांचा विचार करून सर्व्हर डाऊन बाबत लक्ष घालून यावर तोडगा काढावा. तसेच कर्मचारी कमी असतील तर ते भरावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!