कोलगांव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलगांवला स्टडीॲप चे वाटप
कोलगांव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलगांवला स्टडीॲप चे वाटप
रोटरी क्लब यांच्या माध्यमातून आणि श्री अभिजीत टिळवे यांच्या संकल्पनेतून कोलगाव विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना स्टडी ॲप चे वाटप करण्यात आले. या ॲपद्वारे मुलांना अभ्यास करणे सोयीचे होणार असल्याचे सांगण्यात आले.यामध्ये दहावीचा पूर्ण अभ्यासक्रम, प्रश्न – उत्तर, प्रश्नपत्रिका, उत्तर पत्रिका यांचा समावेश आहे हे सर्व तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना दहावी नंतर पुढे काय काय करता येईल कोणत्या कोर्स, शिक्षणाला जावे याची पूर्ण माहिती अँप द्वारे मुलांना मिळेल. या प्रसंगी लॉटरी क्लबचे अध्यक्ष श्री.सुहास सातोसकर सचिव श्री.आबा कसाळीकर श्री. अभिजीत टिळवे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.ढोले मॅडम श्री. मेस्त्री सर,लाडू जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी हायस्कूलच्या शिक्षकांनी लॉटरी क्लबचे आभार व्यक्त केले.

