कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

मालवणात १७ पासून करवंटीपासून वस्तू प्रशिक्षण

*🟥 मालवणात १७ पासून करवंटीपासून वस्तू प्रशिक्षण*

*🟥 व्यावसायिक महासंघाचे मोंडकर यांची माहिती*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण,दि-०८:-* मातृत्व वरदान फाऊंडेशन व कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे नारळाच्या करवंटीपासून उपयुक्त आकर्षक वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत येथील हॉटेल श्री महाराज येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित केले आहे. प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आहे. कोकण पर्यटन व्यावसायिक महासंघ व मातृत्व वरदान फाऊंडेशन ही संस्था जिल्हयातील पर्यटन व व्यावसायिक वाढीसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करून स्थानिक भागात रोजगार निर्मितीसाठी कार्य करत आहे. आपल्या भागात नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने तेवढ्याच मोठ्या प्रमाणात करवंट्या उपलब्ध होतात. त्या विशेष करून जाळण्यासाठी वापरल्या जातात. त्याऐवजी त्यापासून उपयुक्त आकर्षक वस्तू निर्माण करणे शक्य आहे. या वस्तूंना मोठी मागणीही आहे. त्यामुळे अर्थार्जन होईल व करवंटी ज्वलनाने होणारे प्रदूषणही टळेल, हाच प्रशिक्षणाचा उद्देश आहे. यात सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट, महिला अशा. कलाकुसरीच्या कामात आवड असणाऱ्या कलाकारांना संधी उपलब्ध होणार आहे. आयोजनाचा प्रदीर्घ अनुभव असलेली जिल्हयातील नामांकित संस्था, या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ प्रशिक्षक प्रत्येकाला प्रात्यक्षिक करण्याची संधी, प्रात्यक्षिक साहित्य पुरवठा, संस्थेद्वारा लेखन साहित्य पुरवठा, भोजन व्यवस्था, प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!