🟥वाहनतळासाठी बंदर विभागाकडून लवकरच निविदा
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 मालवण, दि.०६: नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर बंदर विभागाकडून वाहनतळाच्या जागेतील सर्व अतिक्रमणे हटविण्यात आल्याची जोरदार चर्चा त्यावेळी झाली होती. त्यामुळे आता नौसेना दिनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर वाहनतळाबाबत बंदर विभागाचे पुढचे धोरण काय, याकडे स्टॉलधारकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, बंदर विभागाकडून लवकरच वाहनतळ आणि बंदर टर्मिनससंदर्भात एकत्रित निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता बंदर विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर बंदर निरीक्षक कार्यालयासमोरील प्रशस्त वाहनतळाची जागा मोकळी करण्यात महाराष्ट सागरी मंडळाला यश आले होते. स्टॉलधारकांनीही या
जागेतील आपले स्टॉल आणि नौका
स्वतःहून बाजूला केल्या होत्या. पण नौसेना दिनानंतर आपल्याला पुन्हा याठिकाणी रोजगाराच्या संधी मिळतील का, याची चाचपणी आता त्यांच्याकडून सुरू झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, बंदर टर्मिनस आणि वाहनतळ पे अँड पार्किंगसंदर्भात एकत्रित निविदा निघाल्यानंतर जो ठेकेदार ठेका घेणार आहे, त्याच्या धोरणावर बरेच काही अवलंबून असणार आहे. पे अँड पार्किंगचा ठेका घेत असताना ठेकेदारास एका ठराविक भागात स्टॉलधारकांना जागा देणे उचित वाटले, तर वाहनतळ परिसरात स्टॉल लागू शकतात. मात्र, त्यासाठी ठेकेदाराच्या अटी- शर्थीचे पालन त्यांना करावे लागणार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सागरी मंडळाच्या निविदा प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

