कोकणमनोरंजनमहाराष्ट्रवेंगुर्ले

वेंगुर्त्यात १५ रोजी लंगार नृत्य स्पर्धा

*🟥 वेंगुर्त्यात १५ रोजी लंगार नृत्य स्पर्धा*

*🟥 दशावतार वेशभूषा स्पर्धा, अभिनय स्पर्धा*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले,दि-०५:-* पहिल्या अखिल भारतीय दशावतार नाट्य संमेलनाच्या निमित्ताने अखिल भारतीय दशावतार नाट्य परिषद आणि संशोधन संस्था व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यातर्फे सिंधुदुर्ग जिल्हयातील पहिली दशावतार लंगार नृत्य स्पर्धा १५ डिसेंबर रोजी वेंगुर्ले येथील साई मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्यास अनुक्रमे १०००, ७०० व ५०० रुपये, चषक व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांकाना चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सादरीकरणासाटी ३ मिनिटाचा वेळ देण्यात येणार आहे. नांव नोंदणी करताना दोघेही स्पर्धक उपस्थित असणे आवश्यक. स्पर्धेत बारावीपर्यंतचे स्पर्धक सहभागी होऊ शकतील. अधिक माहितीसाठी प्रा. सचिन परुळेकर ९४२१२३८०५३ येथे संपर्क साधावा, असे आवाहन महेश राऊळ यांनी केले आहे.

*खुला गट दशावतार वेशभूषा स्पर्धा*
शुक्रवार १५डिसेंबर रोजी सकाळी
८.३० वाजता साई मंगल कार्यालय
वेंगुर्ले येथे खुला गट दशावतार वेशभूषा स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे १०००, ७००, ५०० व उत्तेजनार्थ दोघांना २५०, २५० व चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. वेषभूषा स्पर्धेतील स्पर्धकांनी वेळेत उपस्थित राहून ग्रंथ दिडींत सहभागी होणे बंधनकारक आहे. संपर्क-प्रा. सचिन परुळकर ९४२१२३८०५३.

*शालेय दशावतार अभिनय स्पर्धा*

ही स्पर्धा शनिवार १६ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणर आहे. ही स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी असून यात बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. अभिनयासाठी ३ मिनिटे वेळ देण्यात येणार आहे. वेशभूषा, रंगभूषा अत्यावश्यक नाही. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे १०००, ७००, ५०० रुपये, चषक व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना चषक देण्यात येणार आहे जास्तीत-जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महेश राऊळ यांनी केले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!