कुडाळराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात पर्यटन व विकासात भर टाकणाऱ्या चिपी विमानतळ भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य द्यावे; मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब

▪️जिल्ह्यातील बेरोजगारांच्या रोजगारासह विमानतळ लवकरच कार्यान्वित करावे; जिल्हाध्यक्ष परब यांच्यासह स्थानिकांची मागणी

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.१५: स्थानिक वृत्तपत्रे व सोशल मीडियावर चिपी विमानतळ २३ जानेवारी २०२१ रोजी  कार्यान्वित होणार या आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्याअनुषंगाने मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने स्थानिक बेरोजगारांसह सोमवारी चिपी विमानतळ येथे आयआरबी चे अधिकारी श्री. लोणकर, अमर पाटील, एअर ट्राफिक कंट्रोल अधिकारी, तसेच फायर सेफ्टी अधिकारी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करीत लक्ष वेधले. यावेळी मनसेचे उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे सुबोध परब, समीर नाईक, सागर सावंत, आदी उपस्थित होते.

यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने स्थानिक बेरोजगारांन सह विमानतळ कामाची पहाणी करीत विविध मागण्याबाबत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यात प्रामुख्याने विमानतळ नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळावे, कंत्राटी कामगार भरतीच्या एजन्सीला स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशी अट आयआरबीने करारात नमूद करावी, नोकर भरतीच्या जाहिरातींना स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी देण्यात यावी, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळावरील हॉटेल व्यावसायिक, मालवण येथील पर्यटन संस्था, स्कूबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट, यांच्या संघटनांची संयुक्त बैठक घेऊन हवाई वाहतुकीसंदर्भात जनजागृती व जाहिरात करावी. जेणेकरून पर्यटकांचे हवाईमार्गे जिल्ह्यात येण्याचे प्रमाण वाढेल आणि स्थानिकांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. विमानतळाच्या बाहेरील रेंन्ट कॅब, टुरिझम गाईडस यामध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य मिळावे, आदी मागण्या जिल्हाध्यक्ष धीरज परब व शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांकडे केल्या. तसेच विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित करावे अशा शुभेच्छा दिल्या.

विमानतळ भरती प्रक्रिया ही पारदर्शक व गुणवत्तेच्या आधारे होणार आहे. त्यामुळे स्थानिक युवकांनी एजंट अथवा दलालांच्या आमिषांना बळी पडू नये. असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री. परब यांनी केले आहे.

दरम्यान दोन-तीन वर्षांपूर्वी शिवसेना व भाजप पक्षाच्यावतीने विमानतळ नोकर भरती च्या संदर्भात स्थानिकांना मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली होती. परंतु त्याचा स्थानिकांना कोणताही फायदा झालेला नाही. निवडणुकीच्या आधी अशा प्रकारची शिबिरे घेऊन केवळ राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न या विरोधी पक्षांनी केला आहे. असे देखील श्री. परब म्हणाले.

*_💥बायपास टाळा ॲन्जिओप्लास्टी टाळा!!हदयविकार टाळा!!!💥_*

     *🔥शनिकृपा हार्टकेअर सेंटर🔥*

*शुक्रवार दि. १८ डिसेंबर २०२० सकाळी १० ते दुपारी १ चिपळूण.. व दुपारी ३ ते सायं. ६ रत्नागिरी..* (नावनोंदणी अवश्य)

💫डॉ.जयवंत खबाले हदयाची कार्टोग्राफी करतील व आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीने उपचार करतील..

💫गेली २० वर्षात हजारो हदयविकार रूग्णावर विनाशस्रक्रिया यशस्वी उपचार..

🔹प्रविण मलुष्ठे बंगल्यासमोर, साळवी स्टॅाप, नाचणे, रत्नागिरी.
🔹दिपक लॅाजच्या पाठीमागे, भोगाळे, चिपळूण.

*🔮फोन:*
*_📱9689008081_*
*_📱9960316318_*
*_📱9960316318_*

🌈मंगळवार, बुधवार, गुरूवार तिन दिवस..

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!