करियरवेंगुर्लेशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

सन २०२० च्या कला उत्सवात पाट हायस्कूलचे घवघवीत यश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ले,दि.१५: कला उत्सव हा शिक्षण मंत्रालय भारत सरकार आणि राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य शासनामार्फत युवा कलाकारांसाठी राबविला जात असून गेल्या चार वर्षात जिल्ह्यातील विविध विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कलाप्रकारात सहभाग दाखविला आहे. पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी नाट्य, नृत्य, गायन, वादन या प्रकारात विभाग स्तरावर यश मिळविले आहे.

युवा कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून शासनाने ही स्पर्धा नववी ते बारावी या गटासाठी सुरू केली आहे  पाट हायस्कूल मध्ये काळाची पावले ओळखून कै. एकनाथ ठाकूर कलाअकादमी सुरु करण्यात आली. यामध्ये  पखवाज वादन, हार्मोनियम वादन, शास्त्रीय गायन, कथक नृत्य, चित्रकला, रांगोळी अशा विविध कला प्रकाराचे क्लास सुरु केले आहेत.

कुमार सुमन सुनिल गोसावी, शास्त्रीय गायन, कुमार राज विठोबा कुंभार, त्रिमित चित्र, कु. सानिका कुंभार, पारंपारिक नृत्य, कु. श्रुतिका आनंद मोर्ये, पखवाज वादन या प्रकारात सहभागी झाले होते. त्यांनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविण्यात यश मिळाले आहे.

आता राज्यस्तरीय स्पर्धा सावित्रीबाई फुले सभागृह पुणे येथे होणार आहे. या त्यांच्या जिल्हास्तरीय यशाबद्दल एस.के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्याध्यापक शामराव कोरे, उपमुख्याध्यापक रामचंद्र ठाकुर, पर्यवेक्षक राजन हंजनकर, कलाशिक्षक संदीप साळसकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या सर्व विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशा बद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे पंचक्रोशीतून फार कौतुक होत आहे.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!