आणखीकुडाळसामाजिकसिंधुदुर्ग

कांदुळी गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी चा उद्या वार्षिक जत्रोत्सव..

▪️सर्वांनी कोरोना काळातील शासनाच्या नियमांचे पालन करून जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा; ग्रामस्थांचे आवाहन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ

🎴कुडाळ,दि.१५: तालुक्यात माणगाव खोऱ्यातील कांदुळी गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी चा वार्षिक जत्रोत्सव उद्या बुधवार दिनांक १६ डिसेंबर २०२० रोजी कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती कांदुळी ग्रामस्थांनी दिली.

निसर्गरम्य वातावरणात सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कांदुळी गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी च्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त सालाबाद प्रमाणे सकाळ पासून देवीची विधिवत पूजा तसेच ओटी भरणे, नवस बोलणे नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. त्यानंतर रात्री ११:०० वाजता ढोल-ताशांच्या गजरात मंदिराभोवती देवीची पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर रात्रौ उशिरा पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ उभादांडा वेंगुर्ले यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होऊन पहाटे जत्रोत्सवाची सांगता होणार असल्याचे कांदुळी ग्रामस्थांनी सांगितले.

तरी सर्व भाविकांनी माहेरवाशीणींनी, चाकरमान्यांनी तसेच मित्रमंडळींनी कोरोना काळातील शासनाच्या नियमांचे पालन करून श्री देवी सातेरी च्या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कांदुळी ग्रामस्थांनी केले आहे.

*_💥बायपास टाळा ॲन्जिओप्लास्टी टाळा!!हदयविकार टाळा!!!💥_*

     *🔥शनिकृपा हार्टकेअर सेंटर🔥*

*शुक्रवार दि. १८ डिसेंबर २०२० सकाळी १० ते दुपारी १ चिपळूण.. व दुपारी ३ ते सायं. ६ रत्नागिरी..* (नावनोंदणी अवश्य)

💫डॉ.जयवंत खबाले हदयाची कार्टोग्राफी करतील व आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीने उपचार करतील..

💫गेली २० वर्षात हजारो हदयविकार रूग्णावर विनाशस्रक्रिया यशस्वी उपचार..

🔹प्रविण मलुष्ठे बंगल्यासमोर, साळवी स्टॅाप, नाचणे, रत्नागिरी.
🔹दिपक लॅाजच्या पाठीमागे, भोगाळे, चिपळूण.

*🔮फोन:*
*_📱9689008081_*
*_📱9960316318_*
*_📱9960316318_*

🌈मंगळवार, बुधवार, गुरूवार तिन दिवस..

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!