राष्ट्रवादी काॕग्रेसच्या तालुका कार्यालयाचे उदृघान जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते संपन्न..
▪️आमची ताकद विचारलात तर त्याचे परिणाम निवडणूकीनंतर दिसतील; भाजप व मित्र पक्षांना सामंत यांचा इशारा
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.१४ सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काॕग्रेस पक्षाची ताकद वाढत आहे. यापुढे राष्ट्रवादीला हलक्यात घेऊ नका. पक्षाचा विचार केल्याशिवाय कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही. आमची ताकद विचारलात तर त्याचे परिणाम निवडणूकीनंतर दिसतील असा इशारा भाजप व मित्र पक्षांना राष्ट्रवादी काॕग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिला आहे.
वैभववाडी येथे राष्ट्रवादी काॕग्रेसच्या तालुका कार्यालयाचे उदृघान श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी काका कुडाळकर, अशोक पवार, सुमित आचरेकर, रुपेश जाधव, डाॕ.अभिनंदन मालंडकर, भास्कर परब, अनंत पिळणकर, शिवाजी ओगले वैभववाडी तालुकाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, आगामी वाभवे वैभववाडी नगरपंचायत निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्यास आमचे प्राधान्य असेल. वरिष्ठ पातळीवरुन तसे आदेश आहेत. मात्र मित्र पक्षांकडूनही आम्हाला सन्मानजनक वागणूक मिळाली पाहीजे. अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली.
खासदार विनायक राऊत यांनी महाविकास आघाडीबाबत भूमिका घेतली आहे. त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करीत असून महाविकास आघाडीबाबत आम्ही सकारात्ममक आहोत. असेही सामंत यांनी सांगितले आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची आवश्यकता आहे. वाभवे वैभववाडी नगरपंचायतीवर आमचा नगराध्यक्ष राहावा यासाठी वैभववाडी नगरपंचायत निवडणूक विकासाच्या प्रश्नावर लढविली जाणार आहे. वैभववाडी शहरातील पाणी प्रश्न हा गंभीर असून याला प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे लक्ष वेधले आहे. पक्षाकडून वैभववाडी शहराच्या विकासासाठी निष्कलंक, चारित्र्यवान व राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारधारेवर काम करणारे तरुण उमेदवार देण्यात येतील.
संपूर्ण जिल्ह्यात गाव तिथे राष्ट्रवादी काॕग्रेसची बुथ कमिटी तयार करण्यात येईल. प्रत्येक बुथवर किमान पाच सक्रीय कार्यकर्ते असावे. यासाठी येत्या काळात काम करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीचे नेते काका कुडाळकर म्हणाले, वैभववाडी नगरपंचायतीचा विकास ज्या पध्दतीने व्हायला हवा होता. तसा झालेला नाही. नगरपंचायतीचा वापर हा सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केला आहे. नगरपंचायतीकडून नागरीकांना अपेक्षित नागरीसुविधाही पूर्ण झालेल्या नाहीत. त्या आम्ही पूर्ण करणार आहोत. असे सांगितले.
दरम्यान येत्या काही दिवसात भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. अशी माहीती जिल्हाध्यक्ष सामंत यांनी दिली.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

