राजकीयवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

भुईबावडा मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..

▪️यापुढे गाव तीथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक तयार करण्याचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे आवाहन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.१४: भुईबावडा पंचायत समिती मतदार संघात शिवसेना मतदार नोंदणीसाठी आयोजित केलेल्या बैठकीत भुईबावडा मतदार संघातील तिरवडे तर्फे सौंदळ, जांभवडे, आखवणे, हेत या गावांतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, पक्ष निरीक्षक बाळा भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यामध्ये तिरवडे तर्फे सौंदळ सागर इंदुलकर, आखवणे भोम चे भाजपा चे बूथ अध्यक्ष बाद्रे, हेत मधील ज्ञानेश्वर फोंडके  मिलिंद गुरव, विकास फोंडके, काशीराम फोंडके, यांसह ५० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी बोलताना सतीश सावंत म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचे शिवसैनिक प्रत्येक घराघरात तयार करा, यापुढे गाव तीथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याच प्रमाणे शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने शासनाच्या विविध योजना गावागातल्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवाव्या व त्याचा लाभ मिळवून द्यावा. असे म्हणत वैभववाडी तालुक्यातून जास्तीतजास्त सभासद नोंदणी करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असे काम करा, असेही आवाहन श्री. सावंत यांनी  शिवसैनिकांना केले.

यावेळी अतुल रावराणे, वैभववाडी पक्ष निरीक्षक बाळा भिसे, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे यांनीही मार्गदर्शन केले.

याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, बँक संचालक दिगंबर पाटील, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी, संदेश पटेल, लक्ष्मण रावराणे, उपतालुका प्रमुख सुरेश पांचाळ, उपतालुका संघटक बाबा मोरे, शहर प्रमुख प्रदीप रावराणे, पप्या पालांडे, युवासेना तालुका प्रमुख अतुल सरवटे, महेश रावराणे, डॉ. जाधव यांसह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!